Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळ्यात १५ दिवस ताजी आणि हिरवीगार राहील कोथिंबीर, पाहा १ खास ट्रिक

उन्हाळ्यात १५ दिवस ताजी आणि हिरवीगार राहील कोथिंबीर, पाहा १ खास ट्रिक

How to store coriander leaves for 15 days: Kitchen hacks to keep coriander fresh: Coriander storage tips for summer: Preserve dhaniya in summer: Long-lasting coriander storage method: १५ दिवस कोथिंबीर ताजा आणि हिरवागार राहण्यासाठी सोपी पद्धत ट्राय करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 09:05 IST2025-04-08T09:00:00+5:302025-04-08T09:05:01+5:30

How to store coriander leaves for 15 days: Kitchen hacks to keep coriander fresh: Coriander storage tips for summer: Preserve dhaniya in summer: Long-lasting coriander storage method: १५ दिवस कोथिंबीर ताजा आणि हिरवागार राहण्यासाठी सोपी पद्धत ट्राय करुन पाहा.

how to store coriander leaves in 15 days summer season simple kitchen hacks follow this step by step | उन्हाळ्यात १५ दिवस ताजी आणि हिरवीगार राहील कोथिंबीर, पाहा १ खास ट्रिक

उन्हाळ्यात १५ दिवस ताजी आणि हिरवीगार राहील कोथिंबीर, पाहा १ खास ट्रिक

जेवणाची चव वाढवण्यासोबत पदार्थाला अधिक आकर्षित करतो तो कोथिंबीर. कोथिंबीर भुरभुरल्याशिवाय पदार्थ सुंदर दिसत नाही. तसेच चव देखील छान लागत नाही. सॅलड, भाजी, डाळ असो किंवा रायता कोथिंबीर घातल्याशिवाय डिश सुंदर दिसत नाही. (How to store coriander leaves for 15 days) सुट्टीच्या दिवशी आपण बाजारातून भाज्या आठवड्याभराच्या घेऊन येतो. भाज्या अधिक काळ टिकण्यासाठी आपण अनेक प्रयोग करतो. परंतु, कोथिंबीर टिकण्यासाठी आपण हवी ती काळजी घेत नाही. त्यामुळे त्याची पाने लगेच पिवळी पडतात. (Kitchen hacks to keep coriander fresh)
वाढत्या उन्हाचा आपल्या आरोग्यासह भाज्यावरही परिणाम होतो. (Coriander storage tips for summer) या काळात कोथिंबीरीसह इतर गोष्टींचा भाव देखील वाढतो. तसेच बरेचदा कोथिंबीर बाजारात कमी प्रमाणात पाहायला मिळतो. अशावेळी १५ दिवस कोथिंबीर ताजा आणि हिरवागार राहण्यासाठी सोपी पद्धत ट्राय करुन पाहा. भाजी, डाळीसह इतर पदार्थांची चव देखील वाढेल. पाहूया सोपी ट्रिक. (Long-lasting coriander storage method)

मिरच्या- लसूण चिरताना हातांची आग होते? शेफ पंकजांनी दिल्या भन्नाट टिप्स, जळजळ कमी होईल...

कोथिंबीर फ्रेश ठेवण्यासाठी आपल्याला लहान आणि मोठ्या बॉक्सची गरज लागेल. लहान बॉक्स अर्ध्या पाण्याने भरा. मोठा गोल डबा घ्या. त्याचे झाकण छोट्या बॉक्स खाली ठेवा. यामध्ये कोथिंबीर साफ करुन देठासह ठेवा, मोठा डबा उलटा करुन झाकण व्यवस्थित लावा. डब्यात ठेवलेला कोथिंबीर कुंडीत वाढवल्यासारखा दिसेल. तो फ्रीजमध्ये उलटा ठेवा. हवे तेव्हा तो उघडून कोथिंबीर वापरता येईल. 

कोथिंबीर फ्रेश राहाण्यासाठी आपण दर दोन दिवसांनी त्याचे पाणी बदलायला हवे. कोथिंबीर हा उन्हात ठेवू नका. जेव्हा आपण कोथिंबीर साफ करुन साठवतो तेव्हा तो हवा बंद डब्यात ठेवा. तसेच याची पाने आपण तोडून टिश्यू पेपरमध्ये ठेवू शकतो. असे केल्याने त्याचा ताजेपणा आणि सुगंध कायम टिकून राहिल. 

">

कोथिंबीर जास्त दिवस टिकवायचा असेल तर आपण त्याला हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी सगळ्यात आधी धुवून त्याची मुळे कापून घ्या. त्याची पाने पाण्यात पूर्ण भिजवा आणि सुकल्यानंतर त्याला बारीक चिरा. चिरलेली कोथिंबीर हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे तो आठवडाभर ताजा आणि हिरवागार राहिल. 


 

Web Title: how to store coriander leaves in 15 days summer season simple kitchen hacks follow this step by step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.