Lokmat Sakhi >Social Viral > डाळींना बुरा लागतो, डाळीत किडे होतात अशावेळी काय करायचे? २ सोप्या ट्रिक्स, डाळी खराब होणार नाहीत

डाळींना बुरा लागतो, डाळीत किडे होतात अशावेळी काय करायचे? २ सोप्या ट्रिक्स, डाळी खराब होणार नाहीत

How To Store Dal Or Pulses For Long Time Tips and Tricks : डाळी खराब होऊ नयेत आणि दिर्घकाळ टिकाव्यात यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 10:10 AM2023-03-02T10:10:20+5:302023-03-02T16:28:01+5:30

How To Store Dal Or Pulses For Long Time Tips and Tricks : डाळी खराब होऊ नयेत आणि दिर्घकाळ टिकाव्यात यासाठी...

How To Store Dal Or Pulses For Long Time Tips and Tricks : Within a few days, the pulses get brown, the germs fall? 2 easy tricks, Insects will stays away | डाळींना बुरा लागतो, डाळीत किडे होतात अशावेळी काय करायचे? २ सोप्या ट्रिक्स, डाळी खराब होणार नाहीत

डाळींना बुरा लागतो, डाळीत किडे होतात अशावेळी काय करायचे? २ सोप्या ट्रिक्स, डाळी खराब होणार नाहीत

आपण किराणा सामान आणले की ते डब्यांमध्ये सोडून ठेवतो. मात्र रोजच्या रोज सगळे सामान वापरले जातेच असे नाही. काही वेळा काही डबे कित्येक दिवस उघडलेही जात नाहीत. त्यामुळे या डब्यांना आणि त्यातील सामानाला हवा लागत नाही. अनेकदा हे डबे ट्रॉली किंवा बंद कपाटांमध्ये असल्याने त्यातील सामान खराब होण्याची शक्यता असते. अनेकदा डब्यांतील सामानाला बुरा लागतो तर कधी कीड लागते. एकदी ही कीड लागली की ते बारीक किडे सगळ्या डाळी पोखरुन खातात. त्यामुळे या डाळींची चक्क पावडर व्हायला लागते. असे धान्य आपण खाऊ शकत नाही कारण त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते (How To Store Dal Or Pulses For Long Time Tips and Tricks). 

सामान खराब झाले की पैसे तर वाया जातातच पण अन्नही वाया जाते. डाळींची किंमत खूप जास्त असल्याने या डाळी फेकून द्याव्या लागल्याने आपली हळहळ होते. आता असे होऊ नये म्हणून काय करायला हवे याबाबत आपल्याला माहिती असतेच असे नाही. अरुणा गुप्ता आपल्याला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कायम काही ना काही उपयुक्त माहिती देत असतात. डाळी खराब होऊ नयेत म्हणून नुकत्याच त्यांनी अशाच काही खास टिप्स आपल्यासोबत शेअर केल्या आहेत. धान्यात बोरीक पावडर किंवा बिब्बा घालण्याची पारंपरिक पद्धत काही जण अवलंबतात. पण त्याहून थोडी वेगळी आणि सोप्या अशा टिप्स आज आपण पाहणार आहोत. 

१. डाळी आपण ज्या डब्यात किंवा बरणीत भरतो त्यामध्ये कडुनिंबाच्या काड्या घालून ठेवाव्यात. कडुनिंबामुळे डाळींना भुरा आणि कडी लागत नाही. या काड्या आपल्याला घराच्या आसपास मिळाल्या नाहीत तरी ग्रामीण भागात त्या आवर्जून मिळतात. तेव्हा त्याठिकाणी गेल्यावर या काड्या अवश्य घेऊन ठेवायला हव्यात. यामुळे डाळी किमान १ वर्ष आहेत तशाच राहू शकतात. 

२. यासोबत आणखी एक सोपी ट्रीक म्हणजे खडे मिठाचा वापर. एका सुता कापडामध्ये खडे मीठ घालून त्याची पुरचुंडी करावी आणि ती डाळींच्या डब्यामध्ये ठेवावी. हे मीठ सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते त्यामुळे हा उपाय करणे अगदी सोपे आहे. काळ्या मिठामुळे डाळींच्या आसपास कीड फिरकतही नाही. 


 

Web Title: How To Store Dal Or Pulses For Long Time Tips and Tricks : Within a few days, the pulses get brown, the germs fall? 2 easy tricks, Insects will stays away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.