Join us  

पावसाळी हवेमुळे आलं लगेच खराब होतं, सडतं, वास येतो? ५ उपाय, आलं राहील एकदम फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 6:47 PM

Kitchen Hacks: पावसाळ्यात बऱ्याचदा आलं लवकर खराब होतं. सडून जातं. असं होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये आलं कशा पद्धतीने साठवून ठेवावं यासाठी काही टिप्स..

ठळक मुद्देपावसाळ्यात आलं कसं साठवून ठेवावं जेणेकरून ते अधिक काळ टिकेल, यासाठी हे काही उपाय

पावसाळ्याच्या दिवसांत (monsoon season) एक तर पालेभाज्या, इतर भाज्या महाग झालेल्या असतात. कारण पावसांत, चिखलात अनेक भाज्या सडतात आणि शेतमालाचे नुकसान होते. त्यामुळे या दिवसांत आधीच भाज्यांच्या किमती खूप जास्त वाढलेल्या असतात. अशा परिस्थितीत जर एखादी भाजी किंवा आलं खराब होऊन फेकून देण्याची वेळ आली, तर त्याचं खूपच वाईट वाटतं. म्हणून पावसाळ्यात आलं कसं साठवून ठेवावं (How to store ginger for long time), जेणेकरून ते अधिक काळ टिकेल, यासाठी हे काही उपाय (home remedies) करून बघा.

 

पावसाळ्यात आलं अधिक काळ टिकावं म्हणून...१. आल्याचा ओलसरपणा काढून टाकाआपण जेव्हा बाजारातून आलं आणतो, तेव्हा त्याच्यावर माती लागलेली असते. भाजीवाल्यांनी पाणी शिंपडल्यामुळे ते ओलसर झालेलं असतं. असंच आलं फ्रिजमध्ये ठेवल्या गेलं तर ते लवकर खराब होतं. त्यामुळे सगळ्यात आधी बाजारातून आणलेलं आलं स्वच्छ धुवून घ्या. यानंतर हे आलं पुसून कोरडं करून घ्या आणि उन्हात वाळू द्या. पावसामुळे ऊन नसेल तर घरात पंख्याखाली वाळत ठेवा आणि कोरडं झाल्यानंतरच ते एअरटाईट डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या.

 

२. आलं सुकणार नसेल तरकाही ठिकाणी खूपच पाऊस असतो. त्यामुळे आलं सुकणारच नाही, असं वाटत असेल तर बाजारातून आणलेलं आलं फक्त घरातल्या एखाद्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्या. त्यावरची माती काढून टाका आणि ते अगदी कोरडं करून घ्या. असं कोरडं केलेलं आलं एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा. वापरण्यापुर्वी धुवून घ्या.

 

३. आल्याचे क्युबआलं किसून घ्या आणि तो किस बर्फाच्या ट्रेमध्ये घालून फ्रिजरमध्ये ठेवून द्या. जेव्हा आलं वापरायचं असेल, तेव्हा आल्याचा एखादा आईस क्यूब काढा आणि वापरा. चहासाठीही तुम्ही आल्याचा आईस क्यूब वापरू शकता. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्समानसून स्पेशल