Lokmat Sakhi >Social Viral > Storage of Grain: वर्षभराचं धान्य घ्यायचं पण कीड लागण्याची, अळ्या होण्याची भीती वाटते? करा ९ गोष्टी, धान्य राहील सुरक्षित

Storage of Grain: वर्षभराचं धान्य घ्यायचं पण कीड लागण्याची, अळ्या होण्याची भीती वाटते? करा ९ गोष्टी, धान्य राहील सुरक्षित

Grain Storage At Home: वर्षभराचं धान्य घरात साठवणं हे खरंतर खूपच कौशल्याचं काम. म्हणूनच तर या घ्या काही खास टिप्स.. धान्य राहिल एकदम सुरक्षित.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 05:04 PM2022-05-12T17:04:28+5:302022-05-12T17:05:19+5:30

Grain Storage At Home: वर्षभराचं धान्य घरात साठवणं हे खरंतर खूपच कौशल्याचं काम. म्हणूनच तर या घ्या काही खास टिप्स.. धान्य राहिल एकदम सुरक्षित.

How to store grain at home? 9 tips, grain will be safe for whole year and many more | Storage of Grain: वर्षभराचं धान्य घ्यायचं पण कीड लागण्याची, अळ्या होण्याची भीती वाटते? करा ९ गोष्टी, धान्य राहील सुरक्षित

Storage of Grain: वर्षभराचं धान्य घ्यायचं पण कीड लागण्याची, अळ्या होण्याची भीती वाटते? करा ९ गोष्टी, धान्य राहील सुरक्षित

Highlightsधान्य साठवून ठेवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या आणि मग वर्षभर निर्धास्त रहा. 

उन्हाळा सुरु झाला की घरातल्या महिलांच्या मागे असंख्य कामं लागतात. एकतर शाळांना सुट्ट्या असल्याने मुले घरीच. त्यामुळे सतत त्यांच्या मागे पळा, त्यांच्या खाण्यापिण्याच्या फर्माहिश पुर्ण करा. याशिवाय या दिवसांमध्ये घरी रहायला येणारे पाहुणेरावळे आणि त्यांची व्यवस्था, वाळवणाच्या पदार्थांची लगबग, आमरसाच्या जेवणावळी अशी अनेक कामे भराभर उरकायची असतात. त्यात पुन्हा आणखी एक भर पडते ती म्हणजे वर्षभराची धान्य खरेदी (grain purchase and storage) आणि त्याची व्यवस्थित साठवणूक.

 

बाजारात जाऊन ४- ५ दुकानातले भाव तपासून वर्षभरासाठी धान्य खरेदी केली जाते. त्यासाठी भरपूर पैसाही मोजला जातो. त्यामुळेच तर धान्य वर्षभर सुरक्षित रहावं, त्याला अळ्या होऊ नये अशी आपली इच्छा असते. पण बऱ्याचदा खूप काळजी घेऊनही धान्याला कीड लागते, त्यात अळ्या होतात, अशी अनेक जणींची तक्रार असते. त्यासाठीच तर या घ्या काही खास टिप्स. धान्य साठवून ठेवताना या गोष्टींची काळजी घ्या आणि मग वर्षभर निर्धास्त रहा. 

 

अशी करा घरगुती धान्याची साठवणूक (grain storage at home)
१. धान्य घरात आणल्यानंतर ते कधीही थेट कोठीत भरू नका. कोठीत भरल्यानंतर त्याला एक- दोन दिवस चांगले कडक ऊन दाखवा. तांदूळाला मात्र कधीही उन्हात वाळत टाकू नये.
२. धान्याला ऊन देण्याची देखील एक पद्धत आहे. दिवसातले ६ ते ७ तास ऊन द्यावे आणि नंतर धान्य झाकून ठेवावे.
३. यानंतर धान्य ज्या कोठीत भरणार आहात ती स्वच्छ घासून पुसून कोरडी करून घ्या आणि तिला देखील एखादा दिवस उन्हात ठेवा.
४. कोठी उन्हात वाळवून घेतली की धान्य भरताना कोठीच्या अगदी तळाशी वर्तमान पत्राच्या एक- दोन घड्या ठेवा. वर्तमान पत्रही ओलसर नाही ना, याची खात्री करून घ्या.


५. यानंतर त्यावर कडुनिंबाचा पाला पसरून टाका. त्यावर धान्य टाका. कोठीचा पावभाग भरेपर्यंत धान्य आले की पुन्हा त्यावर कडुनिंबाचा पाला पसरवा. पुन्हा अर्धी कोठी भरेल एवढे धान्य टाका. पुन्हा कडुनिंबाचा पाला पसरवा. पुन्हा धान्य टाका.
६. धान्याच्या सगळ्यात खाली, सगळ्यात वर आणि मध्ये मध्ये दोन- तीन वेळा कडुनिंबाच्या पाल्याचा थर द्यायलाच पाहिजे.
७. काही ठिकाणी कडुनिंबाच्या पाल्यासोबतच काळे मीठ किंवा सैंधव मीठ एका कागदाच्या पुडीत बांधून ठेवतात.
८. गहू, डाळी या धान्यांच्या साठवणूकीसाठी काही ठिकाणी एरंडेल तेलाचा वापर केला जातो. धान्य पसरवायचे. हातात तेल घेऊन धान्यावर थोडे थोडे शिंपडायचे. त्यानंतर धान्य चोळून मग कोठीत भरायचे, अशी प्रक्रिया त्यासाठी केली जाते.
९. तांदूळ साठविण्यासाठी बोरीक पावडर, कडुनिंबाचा पाला, सैंधव मीठ यांचा वापर करावा. 
 

Web Title: How to store grain at home? 9 tips, grain will be safe for whole year and many more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.