Join us  

कांदे-बटाटे लवकर खराब होतात? लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, कांदे-बटाटे टिकतील भरपूर दिवस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2023 5:45 PM

How to store onion and potato's together from Rotting : पैसे देऊन आणलेले सामान खराब झाले की अन्न तर वाया जातेच पण पैसेही वाया जातात.

बाजारातून आपण भाज्या आणि फळे आणतो खऱ्या पण त्या नीट ठेवणे हेही एक महत्त्वाचे काम असते. घरात काय कामं असतात असं अनेकांना वाटतं पण घरात लहान-मोठी बरीच कामं असतात. भाजीपाला नीट स्टोअर करुन ठेवणे, ठराविक वेळात तो संपवणे आणि त्याकडे नीट लक्ष देणे हेही महिलांसाठी इतर कामांपैकी एक महत्त्वाचे काम असते.   काही वेळा ऑफीसचा ताण, सणवार, आजारपणं या गडबडीत काही गोष्टी हातातून राहून जाण्याची शक्यता असते. मात्र असे झाले तर आणलेले सामान वाया जाते. त्यामुळे अन्नही वाया जाते आणि पैसेही वाया जातात. कांदे-बटाटे ही आपल्याला जास्त प्रमाणात आणि अगदी नियमित लागणारी आणि टिकणारी गोष्ट. त्यामुळे आपण आणतानाच  हे दोन्ही थोडे जास्त आणतो. (How to store onion and potatos togather from Rotting).

कोणत्याही भाजीचं वाटण करायचं असो अथवा एखाद्या पदार्थाला तडका द्यायचा असो आपल्याला कांदे लागतातच. तसेच एखाद्या भाजीत भर घालण्यासाठी नाहीतर एखादा छानसा पदार्थ बनवण्यासाठी बटाटेही लागतात. उपवास असले की तर बटाटे आवर्जून आणले जातात. हे बटाटे आणि कांदे नीट ठेवले तर ठिक नाहीतर हे कांदे सडतात, त्याला पात यायला लागते. बटाट्यांनाही मोड येतात नाहीतर तेही सुरकुतून खराब होतात. यासाठी कांदे आणि बटाटे वेगवेगळे ठेवायला हवेत. पण अनेकदा आपण घाईगडबडीत कांदे आणि बटाटे एकत्र ठेवतो आणि त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया कांदे बटाटे जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या कोणत्या पाहूया...

पंकज भदौरीया सांगतात...

१. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदे आणि बटाटे एकत्र न ठेवता ते २ वेगवेगळ्या बास्केटमध्ये ठेवायला हवेत.कारण या दोन्हीमधून येणाऱ्या वेगवेगळ्या गॅसमुळे हे बटाटे खराब होण्याची शक्यता असते. 

२. तसेच कांदे आणि बटाटे यांना हवा लागण्याची आवश्यकता असल्याने ते बंद बास्केटमध्ये न ठेवता जाळी असलेल्या बास्केटमध्ये ठेवायला हवेत. त्यामुळे त्यांना हवा लागते आणि कांदे-बटाटे चांगले राहण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल मीडियाकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.