Join us  

सोनसळी रंगाची सोनचाफ्याच्या फुलांचा गंध ‘असा’ जपून ठेवा, पाहा वर्षानूवर्षे सोनचाफा साठवण्याची सोपी युक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 3:28 PM

Preserve yellow champa flowers for many years : How to preserve sonchafa flowers in a glass bottle : 1 Simple Way to Preserve Sonchafa Flowers in a Jar : How to store sonchafa in glass bottle without fridge : सोनचाफ्याच्या फुलांची ही भेट तुम्ही कुणालाही देऊ शकता...

हलक्या सोनेरी, पिवळ्या रंगाचा, मंद सुगंध असणारा सोनचाफा सगळ्यांच्याच आवडीचा. सोनचाफ्याचे नाजूकसे पण आकर्षक दिसणारे फुलं कुणालाही आपल्या मोहक सौंदर्याने प्रेमात पाडेल असेच असते. बाजारांत फुलांच्या दुकानात टोपलीत हिरव्यागार पानांवर पसरवून ठेवलेली सोनचाफ्याची फुलं विकत घेण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. सोनचाफ्याची फुलं (Preserve yellow champa flowers for many years) आपण घरात मंद सुगंधित सुवास यावा म्हणून किंवा देवाला अर्पण करण्यासाठी तसेच केसात मळण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी आणतो. सोनचाफ्याची फुलं दिसायला जितकी आकर्षक, सुंदर असतात तितकीच ती नाजूक आणि दीर्घकाळ टिकणारी नसतात. एकदा विकत आणलेली ही फुलं अगदी जेमतेम २ ते ३ दिवस टिकतात. पण या सुंदर फुलांचं देखणं रुप आणि त्यांचा गंध कायम असाच दरवळत राहावा असे सगळ्यांचा वाटते, यासाठी आपण या सोनचाफ्याच्या फुलांना दीर्घकाळ स्टोअर करून ठेवण्याचा प्रयन्त करतो( How to preserve sonchafa flowers in a glass bottle).

काहीजणांच्या घरात काचेच्या बाटलीत सोनचाफ्याची फुलं एका विशिष्ट पद्धतीने स्टोअर करून ठेवलेली आपण पाहिली असतील. अशा एका विशिष्ट पद्धतीने जर आपण ही सोनचाफ्याची फुलं (1 Simple Way to Preserve Sonchafa Flowers in a Jar) स्टोअर करून ठेवली तर ती वर्षानुवर्षे आहे तशीच चांगली राहतात. ही फुलं स्टोअर केल्याने दीर्घकाळ चांगली टिकून राहण्यास मदत तर होतेच, शिवाय ही काचेची बाटली आपण डायनिंग टेबल, शोकेस किंवा घरात इतर ठिकाणी ठेवून घराची शोभा वाढवू शकतो. येणाऱ्या दिवाळीच्या सणाला आपण अनेक प्रकारच्या फुलांनी घराची सजावट करतो. अशावेळी आपण या सोनचाफ्याच्या फुलांचा वापर करून ती काचेच्या बाटलीत स्टोअर करून घराची सजावट करु शकता(How to store sonchafa in glass bottle without fridge).

सोनचाफ्याची फुलं वर्षानुवर्षे चांगली टिकवण्यासाठी...

सोनचाफ्याची फुलं विकत आणल्यावर ती जास्त दिवस टिकत नाहीत. फार फार तर ही फुलं दोन दिवस टिकतात त्यानंतर लगेच पाकळ्या गळायला लागून काळी पडतात. अशी नाजूक आणि नाशवंत सोनचाफ्याची फुलं वर्षानुवर्षे चांगली टिकवण्यासाठी आपण एका सोप्या सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो. या ट्रिकचा वापर केल्याने फुलं खराब न होता दीर्घकाळ चांगली टिकून राहतील. 

कुंडीतल्या झाडांना खूप मुंग्या लागल्या? ४ सोपे उपाय-मुंग्या होतील कमी-झाडं वाढतील जोमानं...

 सोनचाफ्याची फुलं टिकवून ठेवण्यासाठी ही ट्रिक वापरताना आपल्याला काचेची बाटली, पाणी आणि तुरटीचा छोटासा खडा इतके साहित्य लागणार आहे. तुम्ही जितक्या आकाराची बाटली घेतली आहे त्यात जितके पाणी मावेल इतके पाणी एका भांड्यात ओतून घ्यावे. आता या पाण्यात तुरटी ५ ते ६ वेळा फिरवून घ्यावी. त्यानंतर ही काचेची बाटली उघडून त्यात सोनचाफ्याची फुलं एक एक करून टाकावीत. फुलं बाटलीत टाकल्यानंतर त्यात तुरटीचे पाणी ओतावे. पाणी बाटलीच्या तोंडापर्यंत अगदी काठोकाठ भरून घ्यावे. त्यानंतर बाटलीचे झाकण लावून बाटली बंद करून घ्यावी. प्लॅस्टिक किंवा कापडाचा लहानसा तुकडा धाग्याच्या मदतीने बांधून आपण बाटलीचे तोंड सीलबंद करू शकतो. अशाप्रकारे आपण सोनचाफ्याची फुलं वर्षानुवर्षे चांगली टिकवून ठेवू शकतो.   

कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...

लक्षात ठेवा... 

१. सोनचाफ्याची फुलं शिळी नसावीत, ताजी असावीत यामुळे ती काळी न पडता दीर्घकाळ चांगली टिकतात. २. बाटलीत तुरटीचे पाणी भरताना पाणी बाटलीच्या तोंडाशी अगदी काठोकाठ भरावे. यात हवा राहू देऊ नका. असे केल्यास फुलं काही दिवसांनी काळी पडतील. ३. फुलं स्टोअर करण्यासाठी शक्यतो काचेच्याच बाटलीचा वापर करावा. ४. बाटलीचे झाकण व्यवस्थित घट्ट लावून घ्यावे त्यातून हवा जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. ५. शक्य झाल्यांस बाटलीचे झाकण सीलबंद करावे.

टॅग्स :सोशल व्हायरल