Join us  

स्वयंपाकाच्या गॅसचा वास येतो, गॅस लिकेज तर होत नाही? अशावेळी काय कराल.. ३ गोष्टी विसरु नकाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 10:24 AM

How To Take Care Of LPG Gas In Home : गॅस हा वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तपासून घ्यायला हवा.

ठळक मुद्दे कंपनीकडून १९०६ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे त्यावर २४ तास सेवा देण्यात येते. नळी हळूहळू लूज होत असते, त्यामुळे ती नळी नियमित तपासावी. अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.

स्वयंपाकघरात आपण सगळेच एलपीजी गॅस वापरतो. नेहमी गॅस वापरणारे आपण त्याबाबत पुरुसे जागरुक असतोच असे नाही. मात्र कधीतरी गॅसबाबत काही झाले, तर आपण तो दुरुस्त करण्यासाठी कोणाला बोलावतो. परंतु, खरंतर गॅस हा वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तपासून घ्यायला हवा. कारण तो कुठे लिकेज होत नाही ना हे ठराविक दिवसांनी तपासणे आवश्यक आहे, अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. गॅस कार्डवर हेल्पलाइनचा नंबर असतो. त्यावर फोन करून लगेच लिकेज तपासून घ्यावे. कारण सिलिंडर ओट्याखाली असतो. तसेच त्यांची नळी कुठेही खराब होऊ शकते. तुटलेली असू शकते. त्यामुळे गॅसची नियमित तपासणी करणे करणे आवश्यक आहे (How To Take Care Of LPG Gas In Home). 

(Image : Google)

१. गॅसची नळी तपासा

घरात उंदीर असतील तर सिलिंडरची नळी ते कुरतडतात. त्यामुळे तिथून लिकेज होण्याची शक्यता असते. त्याविषयी कायम जागरूक राहावे लागते. स्वयंपाक करताना शेगडी मागे-पुढे सारली जाते. ओटा साफ करताना सरकवली जाते. तेव्हा देखील मागील नळी हळूहळू लूज होत असते, त्यामुळे ती नळी नियमित तपासावी. अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.

२. लिकेज आहे असे वाटल्यास...

गॅस लिकेज झाला असे वाटल्यास घराची खिडक्या, दारे त्वरित उघडावीत. लिकेज असल्यास वास येतो. सगळ्यात आधी रेग्युलेटर चेक कर. तो सुरु असेल तर लगेच बंद करा. गॅसच्या वासाची शंका आली तर काडीपेटी लावू नका. दिवा जळत असेल तर तो आधी बंद करावा. सिलिंडरचा नॉब बंद करावा. गॅस कुठून लिकेज होतो ते तपासून घ्या. 

(Image : Google)

३. इथे करा संपर्क

एलपीजी गॅस सिलिंडरचे लिकेज झाले तर तुमच्या डिलिव्हरी देणाऱ्या मुलाला फोन करू शकता किंवा कंपनीकडून १९०६ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे त्यावर २४ तास सेवा देण्यात येते. गॅसच्या पुस्तकावरही टोलफ्री क्रमांक असतात. 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स