Lokmat Sakhi >Social Viral > पावसामुळे मोबाइल पाण्यात भिजला? बिघडू नये म्हणून काय करावे, काय करु नये...

पावसामुळे मोबाइल पाण्यात भिजला? बिघडू नये म्हणून काय करावे, काय करु नये...

How To Take Care Of Your Phone If it Drop in Water In Monsoon : पाण्यात पडून फोन खराब होऊ नये म्हणून काय करावे आणि काय करु नये हे माहित असायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2023 12:25 PM2023-07-09T12:25:13+5:302023-07-09T12:25:37+5:30

How To Take Care Of Your Phone If it Drop in Water In Monsoon : पाण्यात पडून फोन खराब होऊ नये म्हणून काय करावे आणि काय करु नये हे माहित असायला हवे.

How To Take Care Of Your Phone If it Drop in Water In Monsoon : Phone soaked in water due to rain? What to do, what not to do to avoid spoiling... | पावसामुळे मोबाइल पाण्यात भिजला? बिघडू नये म्हणून काय करावे, काय करु नये...

पावसामुळे मोबाइल पाण्यात भिजला? बिघडू नये म्हणून काय करावे, काय करु नये...

पावसाळ्यात अनेकदा आपण कुठे फिरायला किंवा ट्रेकींगला जातो. यावेळी कितीही काळजी घेतली तरी आपला मोबाइल पाण्यात भिजतोच. बरेचदा जोरदार पाऊस असेल तर सगळी काळजी घेऊनही दुचाकीवर नुसते ऑफीसमधून घरी-येताना किंवा चालत असू तरीही फोन पावसाच्या पाण्यात पूर्ण भिजतो. असे काही झाले नाही तरी कधी बादलीत पडून नाहीतर कधी लहान मुलांकडून फोन पूर्ण ओला होतो. मोबाइल हा आपल्या जीवनावश्यक गोष्टींपैकी एक असल्याने आपण अनेकदा जीवापेक्षाही फोनची जास्त काळजी घेतो. मात्र तरीही अशाप्रकारे पाण्यामुळे फोन खराब होण्याची शक्यता जास्त असते. फोन दुरुस्तीसाठी दिला तर इतका जास्त खर्च सांगतात की त्या खर्चात थोडे पैसे घातले तर नवीन फोन खरेदी करता येतो. अशावेळी पाण्यात पडून फोन खराब होऊ नये म्हणून काय करावे आणि काय करु नये समजून घेऊया (How To Take Care Of Your Phone If it Drop in Water In Monsoon)...

काय करायला हवे? 

१. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोन स्विच ऑफ करा.

(Image : Google)
(Image : Google)

२. त्यानंतर एखादे सुती कापड किंवा टॉवेल, नॅपकीन घेऊन हा फोन बाहेरच्या बाजूने चांगला कोरडा करुन घ्या.

३. फोनमधील सिमकार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढून ठेवा.

४. फोन सिलिका जेलचे बारीक पाटीकं असतात त्यात ठेवा, यामुळे पाणी लवकर शोषले जाते आणि फोन लवकर कोरडा होण्यास मदत होते. 

काय करु नये? 

१. फोन बंद पडला म्हणून आपण अनेकदा तो चार्जिंगला लावतो. मात्र तसे करणे सगळ्यात चुकीचे आहे.

२. याबरोबरच फोनमधील पाणी निघावे म्हणून आपण तो जोरजोरात झटकतो. त्यामुळे स्पिकर किंवा चार्जिंग पॉईंटच्या इथून आत गेलेले पाणी निघेल असे आपल्याला वाटते. पण तसे करणे योग्य नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

३. फोन ओला झाला म्हणून काही जण तो वाळण्यासाठी उन्हात ठेवतात. मात्र असे करणे योग्य नाही, त्यामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता जास्त असते. 

४. अनेकदा फोनमधील पाणी शोषले जाण्यासाठी तो तांदळात ठेवा असे सांगितले जाते मात्र तांदळाचे कण फोनमध्ये अडकून बसण्याची शक्यता असते, त्यामुळे असे करणे शक्यतो टाळा.
 

Web Title: How To Take Care Of Your Phone If it Drop in Water In Monsoon : Phone soaked in water due to rain? What to do, what not to do to avoid spoiling...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.