आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात पाण्याच्या बाटल्या भरुन ठेवल्या जातात. आता उन्हाळा म्हटलं की अशा पाण्याच्या बाटल्या आपण जाऊ तिथे आपल्यासोबत घेऊन जातोच. आजकाल प्रत्येकाच्याच घरांमध्ये पाणी पिण्यासाठी बाटल्यांचा वापर सर्रास केला जातो. ऑफिसला नेण्याबरोबरच, जिममध्ये, प्रवास करताना तसेच घरातील लहान मुलंही पाण्याची बाटली शाळेत घेऊन जातात. बऱ्याचवेळा बाटलीचे तोंड लहान असल्यामुळे आपण ती बाहेरुन स्वच्छ करु शकतो. परंतु अशा निमुळत्या तोंडाच्या बाटल्या आतून साफ करणे फारच कठीण काम असते.
निरोगी जीवनशैली राखण्यासाठी, बहुतेक लोक मिनरल वॉटर पिण्यावर भर देतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यायची असेल तर केवळ स्वच्छ पाणी पिणं पुरेसं नाही, तर आपली पाण्याची बाटलीही स्वच्छ ठेवली पाहिजे.अनेक जण बाटलीत पाणी तर भरून ठेवतात, पण ती बाटली स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवणे विसरतात. ज्यामुळे तुम्ही पित असलेले पाणी दूषित होऊ शकते व त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पाण्याची बाटली स्वच्छ कशी ठेवावी व ती निर्जंतूक कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेऊया(How to Thoroughly Clean Your reusable Water Bottle).
रोजच्या वापरातील पाण्याच्या बाटल्या आतून बाहेरुन स्वच्छ कशा कराव्यात...
पाण्याची बाटली ही बाहेरून साफ करणे खूप सोपे आहे. पण ती आतून पटकन स्वच्छ होत नाही. अशावेळी पाण्याची बाटली आतून स्वच्छ करण्यासाठी एका सोप्या टिप्सचा वापर करु... बाटली आतून स्वच्छ करण्यासाठी, त्या बाटलीत सर्वप्रथम एक टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा त्यात अर्धा कप पाणी आणि एक टेबलस्पून कच्चे तांदूळ घालून परत बाटलीचे झाकण लावून बाटली २ ते ३ मिनिटांसाठी जोरजोरात हलवून घ्यावी. त्यानंतर बाटली एखाद्या माईल्ड लिक्विड सोपं व कोमट पाण्याच्या मदतीने आतून बाहेरून स्वच्छ धुवून घ्यावी.
डास चावल्यामुळे चेहऱ्यावर - हातापायांवर पुरळ येते, आग होते, खाज सुटते? ५ सोपे घरगुती उपाय...
बाटल्यांच्या झाकणावरील पांढरा थर कसा काढावा...
पाण्याच्या बाटल्यांचे झाकण लावतो तो भाग देखील बऱ्याचदा रोजच्या वापराने खराब होतो. या झाकणाच्या भागात काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचे थर साचलेले दिसतात. अशाच बाटलीने पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच हानिकारक आहे. हा पांढरा थर काढण्यासाठी आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो. एका बाऊलमध्ये एक टेबलस्पून बेकिंग सोडा घेऊन त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून घ्यावा. हे मिश्रण अर्धा कापलेला लिंबू घेऊन त्याच्या मदतीने बाटलीच्या झाकणावरील साचलेल्या पांढऱ्या थरांवर चोळून घ्यावे. यामुळे हा साचलेला पांढरा थर सहज काढण्यास मदत होते.
मच्छर चावतात म्हणून घरात सतत मॉस्किटो किलर प्रॉडक्टस वापरता, ३ गंभीर दुष्परिणाम...
बाटलीच्या आतून येणारा कुबट वास कसा नाहीसा करावा...
या रोजच्या वापरातील बाटल्या वापरुन त्यातून कुबट वास येण्यास सुरुवात होते. हा कुबट वास नाहीसा करण्यासाठी एक टेबलस्पून टूथपेस्ट घेऊन बाटलीत ओतावी त्यानंतर त्यात गरम पाणी ओतून बाटली ५ मिनिटांसाठी हलवून घ्यावी. मग हे पाणी ओतून त्यानंतर बाटली एखाद्या माईल्ड लिक्विड सोपं व कोमट पाण्याच्या मदतीने आतून बाहेरून स्वच्छ धुवून घ्यावी. हा उपाय केल्यास या बाटल्यांमधून येणारा कुबट वास घालवण्यासाठी मदत होते.