पाण्याच्या बाटल्या या आपल्या रोजच्या वापरातल्या असतात. प्रवासादरम्यान किंवा शाळा, ऑफिसमध्ये जाताना आपण पाणी सोबत नेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्यांचा वापर करतो. सध्याच्या काळात शक्यतो सगळेच पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरणे पसंत करतात. प्लॅस्टिकच्या बाटल्या या वजनाने हलक्या असतात, त्याची ने - आण करणे देखील सोपे असते अशा अनेक फायद्यांमुळे आपण प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्याला प्राधान्य देतो. सतत वापरली जाणारी ही बाटली आपल्याकडून नीट साफ केली जात नाही. त्यामुळेच अनेकदा बाटल्यांमध्ये कुबट वास येतो किंवा बाटलीच्या झाकणात आणि तोंडाशी काळा थर जमा होतो. अनेकदा आपण बाटली पाण्याने विसळतो आणि तशीच भरतो. पण यामुळे बाटली पूर्णपणे स्वच्छ होतेच असे नाही(How To Clean Algae In Water Bottle).
बाटलीला घाण राहीली आणि पाण्यावाटे ती आपल्या पोटात गेली तर आरोग्याच्यादृष्टीनेही ते चांगले नसते. बाटली निमुळती असल्याने आपला हातही त्यात जाऊ शकत नाही. मग आतूल्या बाजुनेही एकप्रकारचा थर (How to Clean a Water Bottle to Prevent Germs) जमा होतो.अशावेळी बाटल्या साफ कशा करायचा असा एक प्रश्न अनेकांपुढे असतो. हल्ली बाजारात त्यासाठी वेगळे ब्रशही मिळतात पण आपल्याकडे ते ब्रश नसतील आणि घरच्या घरी आपल्याला सोप्या पद्धतीने बाटली साफ करायची असेल तर त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूयात. यामुळे अगदी ५ ते १० मिनीटांत बाटली साफ व्हायला मदत होईल आणि आपले आरोग्यही चांगले राहील(How to clean your reusable water bottle).
पाण्याच्या बाटलीचा तोंडाशी जमा झालेला काळा थर कसा स्वच्छ करावा?
१. राख आणि विटेचे तुकडे :- बाटलीच्या तोंडाशी किंवा आतल्या बाजूने काळपट - मेणचट थर जमा झाला असेल तर आपण राख आणि विटेचा वापर करु शकतो. यासाठी राख आणि वीट यांचा एकत्रित भुगा करुन घ्यावा. आता हा तयार भुगा बाटलीत घालून त्यावरून गरम उकळते पाणी ओतावे. मग बाटलीचे झाकण बंद करून बाटली ५ ते ६ वेळा हलवत राहावे. १० ते १५ मिनिटे या बाटलीत पाणी असेच राहू द्यावे. त्यानंतर हे पाणी ओतून लिक्विड सोपं आणि स्पंज किंवा घासणीच्या मदतीने बाटली आतून - बाहेरून स्वच्छ घासून घ्यावी.
चक्कू छुरिया तेज करा लो, ते ही घरच्याघरी ! ८ ट्रिक्स- सुरी होईल धारदार तेज...
२. गरम पाणी आणि बेकिंग सोडा :- जर आपण काचेची किंवा स्टीलची बाटली वापरत असाल तर हा उपाय करणे आपल्याला फायदेशीर राहील. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात जाडे मीठ घालावे. आता हे पाणी हलकेच उकळवून झाल्यावर बाटलीत भरावे त्यानंतर बाटलीत ३ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. आता बाटलीचे झाकण लावून रात्रभर बाटली तशीच ठेवून द्यावी. दुसऱ्या दिवशी यात डिटर्जंट पावडर घालावी आणि बाटली स्क्रबर किंवा स्पंजच्या मदतीने घासावी. नंतर स्वच्छ पाण्याने बाटली धुवून घ्यावी.
३. कोल्ड ड्रिंक आणि बेकिंग पावडर :- सर्वातआधी कोणत्याही प्रकारचे कार्बोनेटेड म्हणजेच फसफसणारे कोल्ड ड्रिंक घेऊन ते बाटलीत ओतावे. त्यानंतर त्यावर ३ ते ४ टेबलस्पून बेकिंग पावडर घालावी. मग झाकण लावून किमान तासभर तरी ही बाटली तशीच ठेवून द्यावी. त्यानंतर स्क्रबर किंवा ब्रशच्या मदतीने घासून घ्यावे. यामुळे रोजच्या वापरातील बाटल्या स्वच्छ होऊन त्यावरील काळपट - मेणचट थर लगेच निघून जातो.