पोशाखानुसार वेगवेगळ्या हेअरस्टाईल करणे सगळेच पसंत करतात. अशा अनेक प्रकारच्या हेअरस्टाईल करण्यासाठी काही महत्वाच्या हेअर ऍक्सेसरीज लागतात. अगदी लहानमुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत (How To Tighten Loose Hair Rubber Band) जवळपास सगळ्याच जणी या कापडी रबर बँड्सचा वापर करतात. हेअर बँड, क्लिप, हेअर पीन, रबर बँड अशा बेसिक हेअर ऍक्सेसरीज आपण रोज वापरतो. बेसिक कुठलीही हेअरस्टाईल केली किंवा अगदी साधी वेणी, पोनी टेल बांधला तर रबर बँड हा लागतोच(Hacks To Reshape Loose Hair Rubber Band).
रोजच्या वापरातील असे कापडी रबर बँड सतत वापरून खराब होतात, काहीवेळा तर ते सैल देखील पडतात. कितीही चांगल्या क्वालिटीचे रबर बँड घेतले तरी फार फार तर त्यांचं इलॅस्टिक दोन- तीन महिने टिकून राहातं आणि त्यानंतर ते सैल पडतात. हे असे सैलसर झालेले रबर बँड आपण टाकून देतो. पण त्याच रबरबँडचे लूज पडलेले इलॅस्टिक पुन्हा पाहिल्यासारखे टाईट करुन आपण हे रबर बँड पुन्हा वापरु शकतो. जुन्या झालेल्या रबर बँडचे इलॅस्टिक पुन्हा पाहिल्यासारखे करण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची ते पाहूयात.
रबर बॅण्डचं इलॅस्टिक पुन्हा कसं टाईट करायचं?
सैलसर झालेल्या रबरबॅण्डचं इलॅस्टिक घट्ट करून ते पुन्हा कसं वापरात काढायचं याचा एक सोपा उपाय shiprarai2000 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
केसांना लावण्याचे रबरबॅण्ड कळकट झाले म्हणून फेकू नका, ५ टिप्स - रबरबॅण्ड दिसतील नव्यासारखे...
कंगव्यात अडलेला केसांचा गुंता निघता निघत नाही? २ झटपट ट्रिक्स- हेअर ब्रश होतील नव्यासारखे स्वच्छ...
हा उपाय करण्यासाठी एका लहानशा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये सैलसर झालेलं रबरबॅण्ड टाका आणि पाण्यात १५ ते २० मिनिटे उकळू द्या.
यानंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये बर्फ घालून ठेवा. उकळलेल्या पाण्यातून रबर काढा आणि ते अगदी लगेचच बर्फ ठेवलेल्या थंडगार पाण्यात टाका.
वॉशिंगमशीनमध्ये रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकत्र धुणे झाले सोपे, घ्या 'हा' जादुई कागद...
या थंड पाण्यात ते ५ ते ७ मिनिटे राहू द्या आणि नंतर काढून घ्या. रबराचं इलॅस्टिक आधीपेक्षा बरंच घट्ट झालं असेल.