Join us  

सैल झालेले हेअर रबर बँड फेकता? इलॅस्टिक टाईट करून पुन्हा रबर वापरण्याची बघा आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2024 2:56 PM

How To Tighten Loose Hair Rubber Band: रबरबॅण्डचं इलॅस्टिक गेल्याने ते सैल झालं म्हणून टाकून देत असाल तर ते पुन्हा वापरात आणण्यासाठी काय करावं ते पाहा.

ठळक मुद्देसैलसर झालेले रबर बँड आपण टाकून देतो. पण तेच रबरबॅण्ड पुन्हा कशा पद्धतीने वापरात आणायचे ते पाहा.

रबर बँड, बक्कल किंवा बो ही वस्तू जवळपास प्रत्येक घरात आढळून येते. कारण अगदी लहानमुली पासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत जवळपास सगळ्याच जणी ते कधी ना कधी वापरतात. वापरून वापरून एक दोन महिन्यातच रबर बँड सैलसर होऊन जातात. तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीचे घेतले तरी फार फार तर त्यांचं इलॅस्टिक दोन- तीन महिने टिकून राहातं आणि त्यानंतर ते सैल पडतं (How to tighten loose rubber band). हे असे सैलसर झालेले रबर बँड आपण टाकून देतो. पण तेच रबरबॅण्ड पुन्हा कशा पद्धतीने वापरात आणायचे ते पाहा. (home hacks to tighten hair band or hair rubber again)

 

रबर बॅण्डचं इलॅस्टिक पुन्हा कसं टाईट करायचं?

सैलसर झालेल्या रबरबॅण्डचं इलॅस्टिक घट्ट करून ते पुन्हा कसं वापरात काढायचं याचा एक सोपा उपाय alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

रोजच्या कामांमुळे त्वचेची काळजी घ्यायला वेळच नसतो? विकेंडला करा ५ गोष्टी, सौंदर्य खुलेल

हा उपाय करण्यासाठी एका लहानशा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये सैलसर झालेलं रबरबॅण्ड टाका आणि पाण्यात १५ ते २० मिनिटे उकळू द्या.

 

यानंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये बर्फ घालून ठेवा. उकळलेल्या पाण्यातून रबर काढा आणि ते अगदी लगेचच बर्फ ठेवलेल्या थंडगार पाण्यात टाका.

लाकडी फर्निचर जुनाट दिसू लागलं? २ पदार्थ वापरून स्वच्छ करा, पुन्हा चमकेल अगदी नव्यासारखं

या थंड पाण्यात ते ५ ते ७ मिनिटे राहू द्या आणि नंतर काढून घ्या. रबराचं इलॅस्टिक आधीपेक्षा बरंच घट्ट झालं असेल. 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी