Join us  

वॉश बेसिनवरचे पिवळे हट्टी डाग निघत नाहीत ? ३ सोपे उपाय, बेसिन चमकेल दिसेल स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 12:17 PM

How To Clean a Ceramic Sink Without Chemicals : वॉश बेसिनचा पिवळसरपणा स्क्रबने घासूनही साफ होत नसेल तर काही सोपे घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात...

आपण आपल्या घरातील सगळ्याच गोष्टींच्या स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष देतो. अगदीच रोज जमले नाही तरीही आठवड्याभरातून किमान एक दिवस तरी आपण घराची साफसफाई करतोच. घरात असणाऱ्या वॉश बेसिनचा सगळेच हात धुण्यासाठी व इतर कामांसाठी वापर करतात. दररोज वापरात असणारे हे वॉश बेसिन देखील वेळच्यावेळी स्वच्छ केलेच पाहिजे. असे केले नाही तर आपले पांढरेशुभ्र वॉश बेसिन खराब होऊ लागते, व त्यावर पिवळे - काळे हट्टी डाग पडू लागतात. 

वॉश बेसिनमध्ये पडलेले पिवळे - काळे हट्टी डाग कित्येकवेळा वॉश बेसिन (Dirty Wash Basin Sink) घासून देखील जात नाहीत. अशावेळी आपण अनेक उपाय करून पाहतो, तरी देखील हे डाग जात नाही. यामुळे कितीही स्वच्छ करून देखील वॉश बेसिन अस्वच्छच दिसते. जेव्हा घरी कुणी पाहुणे येणार असतील तेव्हा आपण सर्व घर स्वच्छ करून अगदी लख्ख करतोच. परंतु अशावेळी घरातील बेसिन पुन्हा पांढरेशुभ्र स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर करू(How To Turn Dirty Wash Basin Sink Into Pure White at Home).

घरातील वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी घरगुती सोपे उपाय... 

१. लिंबू आणि व्हिनेगर :- लिंबू आणि व्हिनेगर मिक्स करून या मिश्रणाने बेसिन स्वच्छ केल्यास गंजासारखे हट्टी डागही एका मिनिटात नाहीसे होतात. अशा परिस्थितीत, आपले गलिच्छ वॉश बेसिन स्वच्छ करून पुन्हा पहिल्यासारखे चमकविण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरेल. यासाठी एका भांड्यात लिंबू आणि व्हिनेगर चांगले मिसळा. नंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण बेसिनवर लावा आणि १० मिनिटे ते तसेच राहू द्यावे. आता स्वच्छ कपड्याने पुसल्यानंतर पाण्याने धुवा. असे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केल्यास वॉश बेसिन स्वच्छ ठेवण्यास मदत होते. 

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...

एकदा वापरलेला बटर पेपर फेकून न देता, पुन्हा वापरण्याची १ भन्नाट ट्रिक...

२. बेकिंग सोड्याचा वापर करा :- जर बेसिन पूर्वीसारखे स्वच्छ आणि चमकदार दिसत नसेल, तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता. बेकिंग सोडा हे एक अतिशय स्वस्त परंतु प्रभावी क्लिनिंग एजंट आहे. अशा स्थितीत बेसिनला आठवड्यातून किमान एकदा बेकिंग सोड्याने स्वच्छ केल्याने ते जास्त काळ स्वच्छ ठेवू शकता. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे. या मिश्रणाने बेसिन घासून १० मिनिटे तसेच ठेवावे. आता ते हलके स्क्रब करा आणि पाण्याने धुवा.

३. व्हिनेगर व बेकिंग सोडा :- व्हिनेगर व बेकिंग सोड्याचा वापर करून देखील आपण बेसिनवरचे पिवळे डाग अतिशय सहजरित्या काढू शकता. सर्वप्रथम बेसिनवर सुका बेकिंग सोडा भुरभुरवून घ्यावा. हा बेकिंग सोडा ब्रशच्या मदतीने घासून घ्यावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी त्यावर व्हिनेगर शिंपडावे व पुन्हा बेसिन घासून घ्यावे. या उपायामुळे बेसिन पुन्हा नव्यासारखे दिसायला लागेल. 

पावसाळ्यात फरशी कितीही पुसली तरीही डास, माश्या काही जात नाहीत ? सोपे घरगुती ५ उपाय, डास - माश्या जातील पळून...

हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...

बेसिन स्वच्छ करताना इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. बेसिन स्वच्छ करताना बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करत असाल तर ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.  २. बेसिनची स्वच्छता करताना हातात हातमोजे किंवा ग्लव्हज घाला. 

३. बेसिन धुण्यासाठी हार्ड स्क्रबर व हार्श लिक्विड किंवा डिटर्जंट वापरू नका. 

४. सिरेमिकपासून बनविलेले बेसिन काळजीपूर्वक स्वच्छ करा. 

५. बेसिनमध्ये केसांचा हेअर डाय, पान-गुटखा किंवा वाईन यांसारख्या वस्तू टाकणे टाळा. 

६. बेसिन रोज स्वच्छ करा.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स