अनेकदा बाथरूमच्या खड्ड्यांमध्ये कचरा, केस अडकतात आणि पाणी तुंबतं. खटकटं, कचरा, प्लास्टिक यामुळे बाथरूम- टॉयलेट सिंक ब्लॉक होतं. ज्यामुळे पाणी बाहेर काढणं कठीण होतं. (Easy Way to Unclog Any Drain in Your Home) बाथरूमध्ये अनेकजण केस, शॅम्पूचे पाऊच टाकून देतात. त्यामुळे पाणी बराचवेळ साचून राहतं. बाथरूमचा पाईप ब्लॉक झाल्यामुळे पाणी खाली जात नाही. तुंबलेलं पाणी वाहून जाण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to fix drainage problems in bathroom)
१) गरम पाणी घाला
बाथरूमध्ये पाणी तुंबत असेल तर कोणताही खर्च करता तुम्ही एका भांड्यात पाणी गरम करून हे पाणी बेसिनमध्ये ओता. त्यानंतर बाथरूमच्या नळीजवळ हळूहळू पाणी घाला. पाणी घालताना हात जळणार नाही याची काळजी घ्या.
कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी
२) एसिड घाला
एसिड तुम्हाला केमिक्लस शॉपमध्ये सहज उपलब्ध होईल. हातात ग्लोव्ह आणि पायात चप्पल घालून मगच एसिडचा वापर करा. आजूबाजूला लहान मुलं नसतील याची काळजी घ्या. या उपायाने फक्त ५ मिनिटांत सिंकमधील कचरा निघून जाईल लगेचच थंड पाणी घालू नका. काहीवेळ तसेच राहू द्या.
३) चिमट्याच्या मदतीने स्वच्छ करा
हा उपाय करण्यासाठी तुम्ही चपाती करण्याच्या चिमट्याच्या वापर करू शकता. जुना किंवा वापरात नसलेला चिमटा पापईमध्ये घालून शक्य असेल तितकी घाण बाहेर काढा. पाईपमध्ये कचरा अडकला आणि पाणी थांबत असेल तर बाथरूम साफ करण्यासाठी चिमट्याचा वापर करू शकता. गरम पाणी घातल्यानंतरच त्यात पाईप घाला. कारण गरम पाणी घातल्यानंतर घाण सहज बाहेर येते. यामुळे कचरा बाहेर काढणं सोपं होतं.
कमी जेवता तरी पोट सुटतं चाल्लंय? सकाळी कोमट पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, ६ भन्नाट फायदे
४) बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
१ कप व्हिनेगर आणि १ कप बेकिंग सोडा घालून अर्धा मिनिटं तसंच सोडून द्या. ५ ते १० मिनिटं थांबून या ट्यूबमध्ये गरम पाणी घालू शकता. या केमिकल रिएक्शननंतर ट्यूबमध्ये जमा झालेला कचरा सहज बाहेर येईल.