Join us  

किचन सिंकमध्ये वारंवार पाणी तुंबतं? १ पदार्थ सिंक मध्ये टाका; पाणी तुंबणारच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 5:32 PM

How to Unclog a Kitchen Sink : एक कप गरम पाण्यात लिक्वीड डिशवॉशचे दोन ते तीन थेंब मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये घाला. स्टोव्हसह इतर ठिकाणी स्प्रे करा काही मिनिटांनी पुसून घ्या.

किचन सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवल्यामुळे नेहमीच अन्नाचे लहान मोठे कण बेसिनमध्ये पडत असतात. लोक किचनची स्वच्छचा करतात पण किचन सिंक साफ करायला विसरतात. (How to Unclog a Kitchen Sink) किचन सिंकमध्ये पाणी तुंबते. पाणी तुंबल्यानंतर सगळी कामं खोळंबतात आणि त्याचं नेमकं कारणंही कळत नाही. (How to Fix a Blocked Sink in Easy Steps) अशावेळी प्लंबरला बोलावून खर्च केल्याशिवाय हा त्रास काही सुटत नाही.  किचन सिंक ब्लॉक झाल्यास काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही सिंक स्वच्छ करून घेऊ शकता. (How to unblock kitchen sink)

कॉफी हा उत्तम पर्याय आहे

किचन सिंकच्या स्वच्छतेसाठी कॉफी (Blocked Kitchen Sink) हा उत्तम पर्याय आहेय. यासाठी कॉफी पावडर व्यतिरिक्त तुम्ही लिक्वीड सोप आणि उकळत्या पाण्याचा वापरही करू शकता. जर किचन सिंकमधून पाणी व्यवस्थित बाहेर येत नसेल तर यात कॉफी पावडर आणि लिक्विड सोप घालण्याची आवश्यकता असते. 

व्हिनेगर

किचन सिंक (Kitchen Sink) स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकींग सोडा उत्तम पर्याय आहे.  यासाठी सगळ्यात आधी किचन सिंकमध्ये बेकींग सोडा घाला नंतर त्यात व्हिनेगर घाला. यामुळे सिंकमधील घाण बाहेर येईल.  जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता.

१० दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा किचन सिंकची स्वच्छता करायला हवी. यामुळे किचन सिंक नेहमी चमकदार राहील.  सिंक ब्लॉक होण्यापासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सिंकमध्ये उष्टी भांडी ठेवू नये.  अन्न झाकण न ठेवता बाहेर राहू देऊ नका. सिंक ड्रेनच्या वरच्या जाळीचं कव्हर लावा जेणे करून अन्नकण ड्रेनेज पाईपमध्ये जाणार नाहीत.

किचन सिंक साफ कसं करायचं?

एक कप गरम पाण्यात लिक्वीड डिशवॉशचे दोन ते तीन थेंब मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये घाला. स्टोव्हसह इतर ठिकाणी स्प्रे करा काही मिनिटांनी पुसून घ्या. क्विक क्लिनिंगसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. याशिवाय लिंबू आणि व्हिनेगर बॅक्टेरियांना मारण्यासाठी उत्तम आहेत. लिंबाचा वापर करून तुम्ही किचन कॅबिनेट साफ करू शकता. लिंबू आणि व्हिनेगरचं मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून किचन कॅबिनेटवर स्प्रे करा. नंतर काही मिनिटांनी सॉफ्ट कापडानं किचन काऊंटर स्वच्छ करा.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनकिचन टिप्स