दररोज स्वयंपाकघराचा वापर होतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेस गृहिणीला किचनमध्ये जाऊन जेवण तयार करायला लागते. किचनमध्ये आपण दररोज अन्न शिजवतो, भांडी घासतो. अन्नपदार्थ स्वयंपाकघराच्या स्लॅबवर, सिंकवर, गॅस शेगडीवर पडत राहतात. अशा स्थितीत स्वयंपाकघर रोज व्यवस्थित साफ न केल्यास जंतू वाढू लागतात. सिंक ही अशी जागा आहे जिथे ओलाव्यामुळे जंतूंना वाढण्याची पुरेशी संधी मिळते (Kitchen Sink). शिवाय खरकटंमुळे किचन सिंक खराब तर होतच, यासह ब्लॉक देखील होते.
बऱ्याचदा भांडी घासताना त्यात अन्नाचे कण, चहापत्ती, शिवाय खरकटं अडकते. ज्यामुळे किचन सिंक ब्लॉक होते. ज्यामुळे घरभर दुर्गंधी पसरते (Cleaning Tips). शिव्या तुंबल्यामुळे त्याठिकाणी भांडी घासताना अडचण निर्माण होते. किचन सिंक ब्लॉक झाल्यानंतर आपण प्लंबरला बोलवतो. पण प्लंबरला न बोलवता आपण घरच्या उपायांनी ब्लॉकेज दूर करू शकता(How to Unclog Drain Naturally with Baking Soda).
किचन सिंक ब्लॉकेज दूर करण्यासाठी उपाय
बेकिंग सोडा-लिंबाचा रस
अनेकदा खरकटं अडकल्यानंतर किचन सिंक ब्लॉक होते. ज्यामुळे घरभर दुर्गंधी आणि जंतू पसरते. शिवाय किचन सिंकच्या पाईपमधून पाणी गळत राहते. अशा वेळी आपण बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी एक कप कोमट पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार पेस्ट किचन सिंकमध्ये ओतून ठेवा. या उपायामुळे काही मिनिटात तुंबलेलं किचन सिंक क्लिन होईल.
बाथरूमचे कोपरे काळेकुट्ट? पिवळे डाग निघत नाही? मिठाचा सोपा उपाय, बाथरूम दिसेल चकाचक
बेकिंग सोडा-व्हिनेगर
किचन सिंक ब्लॉक झालं असेल तर, आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या वापराने तुंबलेलं पाणी काढू शकता. यासाठी एका वाटीत ३ चमचे व्हिनेगर घ्या, त्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. तयार पेस्ट किचन सिंकमध्ये घालून ठेवा. या उपायाच्या अॅसिडिक रिएक्शनमुळे पाईपमध्ये अडकलेला कचरा निघेल.
१० रुपयांच्या प्लास्टिक बॉटलने सोला किलोभर लसूण, लसूण सोलण्याचं किचकट काम होईल सोपं
बेकिंग सोडा, मीठ आणि लिंबू
जर आपले किचन सिंक वारंवार ब्लॉक होत असेल, शिवाय त्यातून दुर्गंधीही येत असेल तर, बेकिंग सोडा, मीठ आणि लिंबाच्या रसाचा वापर करून पाहा. यासाठी एका वाटीत लिंबाचा रस, मीठ आणि बेकिंग सोडा घेऊन मिक्स करा. तयार पेस्ट किचन सिंकमध्ये घालून ठेवा. १० ते १५ मिनिटात पाईपमध्ये अडकलेली घाण निघेल. शिवाय किचन सिंक क्लिन होईल.