बरेचदा आपण आपल्या ड्रेसला शोभून दिसेल अशी परफेक्ट मॅचिंग ज्वेलरी घालतो. प्रत्येकीकडे सगळ्या ड्रेसवर घालता येईल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा, नेकलेस किंवा (How to Untangle a Necklace Chain 2 Easy Tips) गळ्यांतील चेन असतात. आपण शक्यतो आपले असे गळ्यातील वेगवेगळ्या पद्धतीचे नेकलेस (How to keep necklaces from tangling) सेट आपल्या ठरवलेल्या ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवतो. परंतु अनेकदा या ज्वेलरी बॉक्समध्ये (Two Tricks for Storing Your Necklaces without Any Tangles) सगळ्या नेकलेस सेट्सचा गुंता झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण अनेकदा आपल्या ज्वेलरी बॉक्समधील दागिने अगदी व्यवस्थितरित्या नीट ठेवतो परंतु काही केल्या हे नेकलेस, माळा एकमेकांत अडकून त्यांचा गुंता होतोच. असा गुंता झाल्यावर नेमकं घाईच्या वेळी आपल्याला त्यातील एखादा नेकलेस किंवा माळ हवी असेल तर आधी तो गुंता सोडवत बसावे लागते( 2 ways to help you avoid knots in your necklace).
घाई - गडबडीत तयार होताना हा गुंता सोडवायला आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. याचबरोबर, एकमेकांत अडकून बसलेल्या या माळा, चेन, नेकलेस यांचा गुंता सोडवणे म्हणजे महाकठीण आणि वेळखाऊ काम. अशा परिस्थितीत, या ज्वेलरी बॉक्समधील नेकलेस किंवा माळा, चेन यांचा गुंता होऊ नये म्हणून आपण एक साधीसोपी ट्रिक वापरून ज्वेलरी बॉक्समध्ये असा गुंता होण्यापासून सुटका करु शकतो.
ज्वेलरी बॉक्समधील नेकलेस किंवा माळा, चेन यांचा गुंता होऊ नये म्हणून...
ज्वेलरी बॉक्समधील नेकलेस किंवा माळा, चेन यांचा गुंता होऊ नये म्हणून तुम्हाला एक छोटासा रुमाल आणि सेफ्टी पिन इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. तर नेमकं रुमाल आणि सेफ्टी पिन घेऊन करायचं काय ते पाहूयात. तुम्हाला किती माळा, चेन, नेकलेस ठेवायचे आहेत यावर तुमच्या रुमालाची साईज ठरेल. जर खूप नेकलेस, माळा असतील तर मोठा रुमाल घ्यावा कमी असतील तर छोटा रुमाल घ्यावा. सर्वात आधी एक छोटासा रुमाल अंथरुन घ्यावा. त्यानंतर एक सेफ्टी पिन घेऊन त्यात नेकलेस किंवा माळ अडकवून घ्यावी. प्रत्येक एका सेफ्टी पीनवर एकच नेकलेस याप्रमाणे प्रत्येक नेकलेस सेफ्टी पीनमध्ये अडकवून घ्यावा. त्यानंतर या नेकल्सच्या उंचीप्रमाणे तो रुमालावर पिनने अडकवून घ्यावा. असे एका बाजूला एक अशाप्रकारे एक - एक नेकलेस माळा अडकवून उभ्या रेषा दिसतील अशा प्रमाणे नेकलेस, माळा, चेन अडकवून घ्याव्यात. आता रुमालावर सगळे नेकलेस अडकवून झाल्यावर हा रुमाल गोलाकार पद्धतीने गुंडाळत त्याचा रोल करून घ्यावा. अशाप्रकारे आपण हा रुमाल आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवू शकतो. रुमालात प्रत्येक नेकलेस, माळ, चेन सेफ्टी पीनला अडकवून लावल्याने त्यांचा गुंता होत नाही. तसेच ही ट्रिक वापरल्याने तुम्ही तुमची ज्वेलरी बॉक्समध्ये नीट गुंता न होऊ देता सांभाळून ठेवू शकता.
याचप्रमाणे, दुसरी ट्रिक म्हणजे आपण स्ट्रॉचा देखील वापर करु शकता. यासाठी आपल्याला प्रत्येक एका नेकलेससाठी एक स्ट्रॉ लागेल. एक स्ट्रॉ घेऊन नेकलेस, माळेचे एक टोक या स्ट्रॉ च्या एका बाजूने घालून दुसऱ्या बाजूने बाहेर काढून हुक लावावे. यामुळे तुमच्या नेकलेस, माळा, चेन यांचा गुंता होणार नाही.