Join us  

कपडे धुतल्यानंतर फॅब्रिक कंडिशनर वापरता की नाही? लक्षात ठेवा ५ गोष्टी, नाहीतर नव्या कपड्यांचा होतो बोळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 6:37 PM

How to properly use fabric conditioner : What precautions should be taken when using fabric conditioner : फॅब्रिक कंडिशनर वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहूयात.

कपडे धुतल्यानंतर ते अधिक आकर्षक व नव्यासारखे दिसण्यासाठी काहीजण फॅब्रिक कंडिशनरचा वापर करतात. कपडे धुवून तर स्वच्छ होतातच परंतु एवढेच गरजेचे नसते. कपडे धुण्यासोबतच ते मऊ आणि सुगंधित ठेवण्यासाठी फॅब्रिक कंडिशनरचा वापर केला जातो. फॅब्रिक कंडिशनरचा वापर केल्याने कपडे दीर्घकाळ नव्यासारखे दिसतात. फॅब्रिक कंडिशनरमध्ये असे काही घटक असतात ज्यांच्या मदतीने कपड्यांचे धागे मऊ राहतात, सुरकुत्या कमी होतात, कपड्यांचा मळ जाऊन ते सुगंधित होतात. याचा वापर केल्याने कपडे कितीहीवेळा धुतले तरीही नव्यासारखेच दिसतात.

कपडे धुण्यासाठी आपण जेव्हा फॅब्रिक कंडिशनरचा वापर करतो, तेव्हा त्याचे उत्तम परिणाम कपड्यांवर व्हावेत यासाठी योग्य फॅब्रिक कंडिशनर वापरणे गरजेचे असते. फॅब्रिक कांडीशनर वापरताना हमखास होणाऱ्या चुका टाळा, नाहीतर फॅब्रिक कंडिशनर वापरून कपडे नव्यासारखे दिसण्याऐवजी दिसतील जुनेच. त्यामुळे फॅब्रिक कंडिशनर वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहूयात(What precautions should be taken when using fabric conditioner).

फॅब्रिक कंडिशनरचा वापर करताना कोणत्या लक्षात ठेवाव्यात... 

१. फॅब्रिक कंडिशनरचा वापर योग्य प्रमाणांत करा :- फॅब्रिक कंडिशनरचा वापर करताना ते योग्य प्रमाणातच वापरावे. याचा वापर करताना त्याच्या प्रमाणाबद्दल योग्य ती विशेष काळजी घेतली पाहिजे. जर आपण कपड्यांसाठी जास्त प्रमाणात फॅब्रिक कंडिशनर वापरले तर त्याचे तेलकट, चिकट डाग कपड्यांवर पडू शकतात. जे सहजपणे काढता येऊ शकत नाहीत, यामुळे तुमचे कपडे खराब होऊ शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही कमी प्रमाणात फॅब्रिक कंडिशनरचा वापर केला तर ते कपड्यांना तितका मऊपणा व सुगंध देणार नाहीत. त्यामुळे कपड्यांसाठी फॅब्रिक कंडिशनर वापरताना त्याचे प्रमाण योग्य ठेवा. प्रत्येक फॅब्रिक कंडिशनरच्या बाटलीवर ते किती प्रमाणात वापरावे याबद्दल सूचना दिलेल्या असतात त्या फॉलो कराव्यात. 

२. योग्य वेळी वापरावे :- फॅब्रिक कंडिशनर कपड्यांसाठी योग्य वेळी वापरणे तितकेच महत्वाचे असते. जर तुम्ही कपडे मशीनमध्ये धुताना फॅब्रिक कंडिशनर वापरत असाल तर कपडे धुतल्यानंतर शेवटचा राउंड होताना ते वॉशिंग मशीनमध्ये घालावे. त्याचबरोबर फॅब्रिक कंडिशनर व्यवस्थित धुतले जाण्यासाठी वॉशिंग मशीनचा एक राऊंड जास्त करा. काही वॉशिंग मशीनमध्ये फॅब्रिक कंडिशनर घालण्यासाठीचा एक वेगळा कप्पा असतो त्यातच फॅब्रिक कंडिशनर घालावे. 

३. थेट कपड्यांवर घालणे टाळा :- फॅब्रिक कंडिशनर वापरताना ते थेट कपड्यांवर घालणे टाळा. यामुळे तुमच्या कपड्यांवर त्यांचे डाग तसेच राहू शकतात. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये जर फॅब्रिक कंडिशनर घालण्यासाठीचा वेगळे डिस्पेंन्सर असेल तर त्यातच ते घालावे. असे नसेल तर फॅब्रिक कंडिशनर घेऊन ते पाण्यात घोळवून मगच कपड्यांमध्ये घालावे. 

मुसळधार कोसळणाऱ्या पावसांत कुठे अडकलात तर? कायम बॅगेत ठेवा ५ वस्तू, राहा सुरक्षित रोजच...

४. योग्य फॅब्रिक कंडिशनरचा वापर करावा :- आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक कंडिशनर अगदी सहज विकत मिळते. आपण आपल्या स्किन टाईपनुसार देखील फॅब्रिक कंडिशनरची निवड करु शकतो. तसेच लहान मुलांसाठी वेगळ्या प्रकारचे फॅब्रिक कंडिशनर मिळते आपण त्याचा देखील वापर करु शकतो. 

५. काही कपड्यांसाठी वापरु नका :- फॅब्रिक कंडिशनर हे मुख्यतः कपड्यांसाठीच वापरले जाते. परंतु काही प्रकारच्या कपड्यांवर याचा वापर केल्याने त्या कपड्यांची क्वालिटी खराब होऊ शकते. वॉटर रेझिस्टंट मटेरियल, मायक्रोफायबर मटेरियल  व स्पोर्ट्सवेअर यांसारख्या कपड्यांसाठी फॅब्रिक कंडिशनर वापरु नका. यामुळे त्या कपड्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स