थंडीचा महिना सुरु झाला. सर्वत्र गारवा जाणवू लागला आहे. मुख्य म्हणजे रात्री आणि सकाळी थंडी जास्त जाणवते. थंडीचे दिवस सुरु झाले की, बऱ्याच घरांमध्ये हिटर, गिझरचा वापर जास्त होतो. सकाळी आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी बरेच जण गिझरचा वापर करतात. गिझरचा वापर ३ महिने होतो.
हिवाळा संपून उन्हाळा सुरु झाल्यानंतर काही जण गिझरचा वापर कमी करतात. किंवा बरेच महिने गिझर बंद पडून राहते. अशा वेळी गिझरचे अनेक पार्टस गंजतात, किंवा खराब होतात. ज्यामुळे लाईट बिलमध्ये वाढ होते. मुख्य म्हणजे सर्व्हिसिंग न केल्यास लाईट बिल तर जास्त येतेच, शिवाय गिझर लवकर खराब होते. जर गिझर लवकर खराब होऊ नये, शिवाय लाईट बिलही जास्त येऊ नये असे वाटत असेल तर, ३ टिप्स नक्कीच फॉलो करून पाहा(How to use geyser properly to reduce electricity bill).
वेळेवर सर्व्हिसिंग करा
अनेक घरात गिझरचा वापर फक्त हिवाळ्यात होतो. थंडी गेली की कोणीही गिझरचा वापर करत नाही. अशा वेळी ८ ते ९ महिने गिझर बंद पडून राहते. अशावेळी गिझर खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गिझरमध्ये कॅल्शियम आणि मॅंगनीज सारखी अनेक खनिजे असतात. ज्यामुळे आतील पार्टस लवकर खराब होतात. यासाठी गिझरची वेळेवर सर्व्हिसिंग करणे गरजेचं आहे. यामुळे लाईट बिलही जास्त येणार नाही.
रांगोळी काढायला जमत नाही? चिंता सोडा, हँगर आणि चमच्याने काढा मोराची सुंदर डिझाईन
पाण्याची गुणवत्ता तपासा
आपल्या भागात जर हार्ड वॉटर सप्लाय होत असेल तर, दर सहा महिन्यांनंतर गिझर सर्व्हिसिंग करा. हार्ड वॉटरमुळे गिझरचे आतील पार्टस खराब होऊ शकतात. यामुळे गिझर नेहमी सर्व्हिसिंग करत राहा, ज्यामुळे गिझरचे पार्टस खराब होणार नाही, शिवाय लाईट बिलही जास्त येणार नाही.
माझेच इन्स्टाग्राम फॉलोअर्स का वाढत नाहीत असा प्रश्न पडलाय? ३ टिप्स, पाहा व्हायरलची खास गोष्ट
गिझरचा स्फोट होऊ नये म्हणून..
गिझर विजेचा वापर करून पाणी गरम करते. ज्यामुळे अनेकदा गिझरचा स्फोट होतो. अशा स्थितीत दर ६ महिन्याला गिझरची सर्व्हिसिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा पाईपही लिक होते. ज्यामुळे त्यामधून करंट बाहेर फ्लो होते, अशा वेळी वीज बिलही जास्त येऊ शकते. त्यामुळे गिझरचा वापर करताना काळजीपूर्वक करावा.