Join us  

कपड्यांवरचे डाग काढायचा घ्या सोपा फॉर्म्युला, १ चमचा सॅनिटायझरची जादू-न घासता कपडे चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2024 4:25 PM

How To Use Hand Sanitizer To Get Rid Of Your Stains : सॅनिटायझरने फक्त व्हायरसच लांब राहत नाही, डागही निघतील झटपट

अनेक मुलं शाळेत खेळता खेळता कपड्यांवर पेनाच्या शाईचे डाग पाडून आणतात. जे लवकर साफ होत नाही. बऱ्याचदा आपल्या कपड्यांवरही नकळत शाईचे डाग पडतात. ज्यामुळे कापड अस्वच्छ तर दिसतेच, शिवाय प्रत्येकाची नजर आधी शाईवर पडते. बऱ्याचदा आपण शर्टच्या खिशात पेन ठेवतो. शर्टच्या खिश्यावरही शाईचे डाग पडतात. जे अनेकदा धुतल्यानंतरही जात नाही. शाईच्या डागाची निशाणी घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. काही उपाय उपयुक्त तर काही उपायांमुळे कापड खराब होत जाते (Cleaning Tips).

जर आपल्यालाही कपड्यावरील शाईचे डाग मेहनत न घेता काढायचे असतील तर, आपण सॅनिटायझरचा वापर करू शकता. सॅनिटायझरच्या वापरामुळे काही मिनिटात डाग गायब होतील, शिवाय कापड स्वच्छ दिसेल(How To Use Hand Sanitizer To Get Rid Of Your Stains).

सॅनिटायझरने घालवा शाईचे डाग

सर्वप्रथम, कापड पाण्याने धुवून घ्या. नंतर शाईच्या डागांवर सॅनिटायझर लावून हाताने साफ करा. जर हाताने साफ करून निघत नसेल तर, खडबडीत जागेवर कापड घासा. आपल्याला सॅनिटायझरमुळे डाग निघत असलेले दिसून येईल. डाग निघाल्यानंतर डिटर्जेंट किंवा साबण लावून धुवून घ्या. ज्याप्रमाणे आपण कापड धुतो, त्याचप्रमाणे कापड स्वच्छ धुवून घ्या. या ट्रिकमुळे काही मिनिटात शाईचे डाग नाहीसे होतील.

लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?

बेकिंग सोडा

निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल

बेकिंग सोडा फक्त जेवणासाठी नसून, इतरही घरातील कामांसाठी उपयुक्त ठरते. कापडावरील शाईचे डाग घालवण्यासाठी एका बाऊलमध्ये तीन चमचे बेकिंग सोडा, अर्धा कप व्हिनेगर, आणि लिंबाचा रस घ्या. सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा. तयार पेस्ट शाईच्या डागांवर लावा. १५ मिनिटानंतर टूथब्रशच्या मदतीने डाग घासून काढा. नंतर ज्याप्रमाणे आपण कापड धुतो, त्याचप्रमाणे कापड स्वच्छ धुवून घ्या. या ट्रिकमुळे काही मिनिटात कापड स्वच्छ होईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल