Lokmat Sakhi >Social Viral > टुथपेस्ट संपत आली? टाकून देण्यापेक्षा असा करा वापर; ३ गोष्टींची स्वच्छता होईल मस्त...

टुथपेस्ट संपत आली? टाकून देण्यापेक्षा असा करा वापर; ३ गोष्टींची स्वच्छता होईल मस्त...

How To Use Leftover Tooth pest for Cleaning : पाहूया संपत आलेल्या टुथपेस्टचा कसा वापर करायचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 02:34 PM2023-01-31T14:34:52+5:302023-01-31T14:37:25+5:30

How To Use Leftover Tooth pest for Cleaning : पाहूया संपत आलेल्या टुथपेस्टचा कसा वापर करायचा...

How To Use Leftover Tooth pest for Cleaning : Running out of toothpaste? Use instead of discarding; Cleaning of 3 things will be great... | टुथपेस्ट संपत आली? टाकून देण्यापेक्षा असा करा वापर; ३ गोष्टींची स्वच्छता होईल मस्त...

टुथपेस्ट संपत आली? टाकून देण्यापेक्षा असा करा वापर; ३ गोष्टींची स्वच्छता होईल मस्त...

टुथपेस्ट ही आपल्या रोजच्या वापराची गोष्ट. महिन्या, दोन महिन्यात ही टुथपेस्ट संपायला येते आणि मग आपसूकच आपण नवीन आणतो. कितीही घासून घेतली तरी थोडी का होईना टुथपेस्ट आतल्या आवरणाला चिकटून राहते. दात स्वच्छ करण्याचे काम करणाऱ्या या टुथपेस्टमध्ये काही केमिकल्सचा वापर केलेला असतो. टुथपेस्ट संपली की ती आपण अगदी सहज कचरापेटीत टाकून देतो. पण यामध्ये चिकटलेल्या पेस्टचा घरातील वस्तू साफ करण्यासाठी अतिशय चांगला वापर होऊ शकतो. प्रसिद्ध शेफ पूनम देवनानी आपल्या इन्स्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याशी शेअर करतात. या टुथपेस्टचा कोणत्या गोष्टी साफ करण्यासाठी कसा वापर करायचा हे त्या आपल्याला त्यांच्या व्हिडिओमधून दाखवतात. पाहूया संपलेल्या टुथपेस्टचा कसा वापर करायचा (How To Use Leftover Tooth pest for Cleaning)...

१. टूथपेस्ट संपली की ती चपटी होते. कात्रीने याचे लहान तुकडे करावेत आणि आवरण उघडावे. यामध्ये थोडी टुथपेस्ट राहीलेली असते. ही टुथपेस्ट खराब झालेल्या टुथब्रशवर घेऊन त्याने आपण विविध प्रकारच्या इलेक्र्टीक वस्तूंचे प्लग घासू शकतो. इस्त्री, ओव्हन, ग्राइंडर यांसारख्या गोष्टी आपण अनेक वर्ष वापरत असतो. त्यामुळे त्यावर घाणीचा थर साचतो. या प्लगला लागलेली घाण, मळ टुथपेस्टमुळे झटपट निघायला मदत होते. ब्रशने घासल्यावर ओल्या कपड्याने प्लग पुसावेत आणि कोरडे करावेत.


२. घरातील बरेच जणांना चष्मा असतो. सारखा वापरुन चष्म्यावर डाग पडतात. हे डाग काही वेळा पाण्याने किंवा फडक्याने निघत नाहीत. अशावेळी राहीलेली टुथपेस्ट आणि कोमट पाण्याने चष्मा साफ करता येतो. यामुळे काचा एकदम स्वच्छ होतात. 

३. आपण कपड्यांना इस्त्री करण्यासाठी घरात इस्त्री वापरतो. ही इस्त्री आपण विशेष साफ करत नाही. मात्र या राहीलेल्या टुथपेस्टचा वापर करुन आपल्याला इस्त्री साफ करता येऊ शकते. पेस्ट आणि टुथब्रशचा वापर करुन ही इस्त्री साफ करता येऊ शकते.  
 

Web Title: How To Use Leftover Tooth pest for Cleaning : Running out of toothpaste? Use instead of discarding; Cleaning of 3 things will be great...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.