Join us  

बाथरूमच्या टाइल्स पिवळ्या पडल्या? लिंबाच्या सालींचा करा 'असा' वापर; मिनिटात बाथरूम क्लिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2024 5:04 PM

How to use Lemon peel to clean Bathroom Dirty Tiles : लिंबाच्या साली फेकून देण्याऐवजी त्याचा वापर बाथरूम टाईल्स स्वच्छ करण्यासाठी करा..

बाथरूम हा घरातील अस्वच्छ भाग असतो (Bathroom Tiles). आपण संपूर्ण घर स्वच्छ करतो. पण बाथरूम साफ करण्याचं राहून जातं. बाथरूमच्या टाईल्स महिनोमहिने स्वच्छ न केल्यास पिवळट, काळे डाग पडतात (Cleaning Tips). जे डिटर्जंट पावडरनं कितीही घासलं तरीही निघत नाही (Lemon Peel). बाजारातून टॉयलेट क्लिनर आणूनही टॉयलेट, बाथरूम पूर्णपणे स्वच्छ होत नाही.

जर बाथरूमच्या टाईल्स अस्वच्छ असतील तर, वेळीच काही घरगुती उपाय करून पाहा. या उपायांमुळे काही मिनिटात मेहनत न घेता बाथरूम टाईल्स स्वच्छ होतील. शिवाय आपलं काम अधिक सोपं होईल. आपण लिंबाचा वापर करून अगदी काही मिनिटात टाईल्स स्वच्छ करू शकता(How to use Lemon peel to clean Bathroom Dirty Tiles).

बाथरूम टाईल्स स्वच्छ कशा करायच्या?

बाथरूम टाईल्स क्लीनरनेही स्वच्छ होत नसतील तर, लिंबाचा वापर करून पाहा. यासाठी ५ ते ६ लिंबाच्या सालींचा वापर करा. मिक्सरच्या भांड्यात ५ ते ६ लिंबाची साली घ्या. त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करा.

मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास

एका बाऊलमध्ये ही पेस्ट काढून घ्या. त्यात हार्पिक किंवा इतर कोणतेही बाथरूम क्लीनर मिसळा आणि पेस्ट बनवा. तयार पेस्ट बाथरूमच्या टाईल्सवर लावा. काही वेळासाठी तसेच राहूद्या.

शाळेत जाताना भीतीपोटी मुल रडतं? करा सोप्या ४ गोष्टी; शाळेत रमतील - अभ्यासही करतील

१५ मिनिटानंतर आपल्या हातांवर हातमोजे घाला आणि नंतर स्क्रबरने टाईल्स घासून काढा. यामुळे बाथरूमच्या टाइल्स पूर्णपणे स्वच्छ होईल. काही वेळानंतर पाण्याने टाईल्स धुवून काढा. यामुळे जास्त मेहनत न घेता, लिंबाच्या सालीचा वापर करून आपण टाईल्स स्वच्छ करू शकता. याव्यतिरिक्त आपण बेकिंग सोड्याचा वापर करूनही बाथरूम टाईल्स स्वच्छ करू शकता.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया