Join us  

संत्र्याची सालं फेकून देता? थांबा, ग्लासभर पाण्यात संत्र्याची सालं उकळवा, स्वच्छ दिसेल घर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 8:46 AM

How to Use Orange Peel Water For Cleaning : संत्र्याच्या सालीच्या उपयोगाने तुम्हाला घरातील अनेक छोटी मोठी काम करता येतील.

संत्री (Orange) फक्त खाण्यासाठीच नाही घरच्या साफसफाईसाठीही फायदेशीर ठरतं. (Home Cleaning Tips) संत्र्याची सालं अनेकजण फेकून देतात. (Homemade Oranges Peel Cleaner) संत्र्याच्या सालीसुद्धा संत्री प्रमाणे फायदेशीर ठरतात. (How To Use Orange Peel Water For Cleaning) संत्र्याच्या साली सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरल्या जातात. संत्र्याच्या सालीच्या उपयोगाने तुम्हाला घरातील अनेक छोटी मोठी काम करता येतील. (Surprising Ways Orange Peel  Can Your Kitchen) गार्डनिंगच्या कामासाठी संत्र्याचा वापर केला जातो. 

१) जर घरातील गार्डनमधील रोपांना किडे लागत असतील तर संत्र्याच्या सालीच्या मदतीने किडे निघून जाण्यास मदत होईल.

२) किटकांना पळवण्यासाठी संत्र्याचे साल फायदेशीर ठरते. 

३) एका भांड्यात ग्लासभर पाणी घ्या. भांड्यात ग्लासभर पाणी घालून सालं उकळवून घ्या. त्यात लिंबाची सालं घालून  किंवा लिंबाचा रस घालून उकळवून घ्या.

४) पाण्याचा रंग बदलल्यानंतर पाणी थंड करून घ्या आणि त्यानंतर एका बॉटलमध्ये भरून घ्या. नंतर स्प्रे बॉटलमध्ये  भरून रोपांवर फवारा. रोपं आणि फुलांच्या झाडांच्या स्प्रे करा. संत्र्याच्या सालीने  किडे दूर होतील.

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

५) स्टेनलेस स्टिल आणि नळाचे, दरवाजे चमकवता येतात जर भांड्यांना डाग लागले असतील किंवा नळ पिवळे झाले असतील तर पाण्यातील डाग निघून जातील. संत्र्याच्या सालीने तुम्ही स्वच्छ करू शकता. संत्र्याची सालं पाण्यात उकळून घ्या नंतर भांडी धुण्याचे लिक्विड घाला. ज्यामुळे डाग निघून जातील आणि ब्रशच्या मदतीने स्वच्छ करता येईल. या उपायाने घरातील नळ चमकू लागतील.

दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर

6) यासाठी एका भांड्यात १ ग्लास पाणी घ्या. यात मीठ मिसळा आणि संत्र्याचे साल मिसळा. संत्री पाण्यात उकळवून घ्या. थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरा.

7) लाकडाचे दरवाजे आणि आरशे स्वच्छ करण्यासाठी या स्प्रे चा वापर करू शकता. ज्यामुळे चमक टिकून राहील. साफसफाईसाठी तुम्हाला अशा प्रकारच्या लिक्विडचा फायदा होईल आणि कमीत कमी खर्चात घरही स्वच्छ राहील.

टॅग्स :सोशल व्हायरलखरेदी