Lokmat Sakhi >Social Viral > तांदुळाचे पाणी फक्त चेहऱ्यालाच लावू नका! घराच्या कानाकोपऱ्यांची करा स्वच्छता - कपभर पाणी करेल घर लख्ख...

तांदुळाचे पाणी फक्त चेहऱ्यालाच लावू नका! घराच्या कानाकोपऱ्यांची करा स्वच्छता - कपभर पाणी करेल घर लख्ख...

How To Use Rice Water For Home Cleaning : Don't waste rice water 4 amazing ways to use it at home : How to Make and Use Rice Water for House Cleaning : महागडे, फिनाईल, क्लिनर्स वापरण्यापेक्षा तांदुळाच्या पाण्याने घर स्वच्छ कसे करावे, ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 17:47 IST2025-04-21T17:28:55+5:302025-04-21T17:47:21+5:30

How To Use Rice Water For Home Cleaning : Don't waste rice water 4 amazing ways to use it at home : How to Make and Use Rice Water for House Cleaning : महागडे, फिनाईल, क्लिनर्स वापरण्यापेक्षा तांदुळाच्या पाण्याने घर स्वच्छ कसे करावे, ते पाहा...

How To Use Rice Water For Home Cleaning Don't waste rice water 4 amazing ways to use it at home How to Make and Use Rice Water for House Cleaning | तांदुळाचे पाणी फक्त चेहऱ्यालाच लावू नका! घराच्या कानाकोपऱ्यांची करा स्वच्छता - कपभर पाणी करेल घर लख्ख...

तांदुळाचे पाणी फक्त चेहऱ्यालाच लावू नका! घराच्या कानाकोपऱ्यांची करा स्वच्छता - कपभर पाणी करेल घर लख्ख...

आपणं दररोजच्या जेवणांत भात तर नक्कीच खातो. भात तयार करण्यासाठी आपण सगळ्यात आधी तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर कुकरमध्ये धुतलेला तांदूळ आणि पाणी घालून (How To Use Rice Water For Home Cleaning) भात शिजवून घेतो. काहीजणांकडे कुकरमध्ये भात शिजवला जातो तर काहीजण टोपात पाणी आणि तांदूळ घालून भात शिजवतात. अशाप्रकारे, भात तयार करताना तांदूळ धुतलेले पाणी तसेच भात शिजवताना उरलेलं पाणी (Don't waste rice water 4 amazing ways to use it at home) आपण शक्यतो फेकूनच देतो. तांदूळ धुतलेलं पाणी किंवा शिजवताना वापरलेलं पाणी निरूपयोगी समजून फेकून देत असाल तर थांबा, कारण या पाण्याचा वापर आपण घर स्वच्छ करण्यासाठी वापरु शकता(How to Make and Use Rice Water for House Cleaning).

खरंतर, तांदुळाचे पाणी हे अनेक प्रकारे उपयोगात येऊ शकते. कोरियन ब्यूटी ट्रेंण्डमध्ये तांदुळाचे पाणी हे त्वचेसाठी सर्वोत्तम मानले जाते. त्यांचा हाच ट्रेंड फॉलो करून सध्या आपण देखील तांदुळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी करतोच. परंतु तांदुळाच्या पाण्याचा वापर करून त्वचेच्या स्वच्छतेसोबतच तुम्ही घराची देखील स्वच्छता करु शकता. महागडे, फिनाईल, क्लिनर्स वापरण्यापेक्षा आपण तांदुळाच्या पाण्याने संपूर्ण घर अगदी स्वच्छ, लक्ख करु शकतो. 

घराच्या स्वच्छतेसाठी तांदुळाच्या पाण्याचा नेमका वापर कसा करायचा ? 

१. आरसे आणि खिडक्यांच्या काचा :- घरातील आरसे आणि खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तांदुळाच्या पाण्याचा वापर करू शकता. यासाठी, तांदूळ धुवून उरलेले पाणी फेकून देऊ नका. तांदूळ धुतलेले पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन स्टोअर करून ठेवावे. घरातील आरसे, खिडक्यांच्या काचेवर हे पाणी स्प्रे करावे, त्यानंतर कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे. तांदुळाच्या पाण्याने आरसे आणि खिडक्यांच्या काचांवर असलेली धूळ, चिकट, तेलकटपणा कमी करण्यास मदत होते. 

फक्त १५ मिनिटांत करा साजूक तुपाच्या फुलवाती, करणं अगदी सोपं आणि उजळतात एक तास प्रसन्न...

२. रोपांच्या पानांवरील धूळ स्वच्छ करा :- तांदुळाच्या पाण्याने आपण रोपांच्या पानांवरील धूळ स्वच्छ करु शकता. यासाठी एका बाऊलमध्ये, तांदुळाचे पाणी घेऊन त्यात कापड किंवा कापूस बुडवून तो भिजवून घ्यावा. त्याने रोपांवरील धूळ पुसून स्वच्छ करून घ्यावी. यामुळे रोपांची पानं स्वच्छ दिसतात तसेच ती हिरवीगार होण्यास देखील मदत होते. याचबरोबर, आपण कुंडीतील मातीत देखील हे पाणी ओतू शकतो, यामुळे रोपांच्या मुळांना मजबूतपणा येतो आणि त्यांची वाढही खूप चांगली होते. 

३. बाथरूम टाईल्स आणि नळ स्वच्छ करा :- बाथरूम टाईल्स आणि नळ स्वच्छ करण्यासाठी आपण तांदुळाच्या पाण्याचा वापर करु शकतो. यासाठी, तांदूळ भिजत ठेवलेले पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर या दोघांपैकी एक पदार्थ मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. त्यानंतर जुन्या टूथब्रशच्या मदतीने आपण हे तांदुळाचे पाणी टाईल्स आणि नळावर लावून मग हलक्या हाताने घासून स्वच्छ करु शकतो. यामुळे टाईल्स व नळ स्वच्छ होतात तसेच नळांवरील पांढरे पाण्याचे डाग देखील साफ केले जातात. 

तूप कढवल्यानंतर तूपकट भांडं कसं घासणार चटकन? ३ सोप्या टिप्स, भांडं चमकेल सेकंदात...

४. फरशी स्वच्छ करण्यासाठी :- तांदुळाच्या पाण्यात स्टार्च आणि एंजाइम्स असतात जे फरशी स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी एक बादली हलक्या गरम पाण्यांत तांदूळ भिजत ठेवून फर्मेंटेशन केलेलं कपभर पाणी ओतावे. या पाण्याने फरशी पुसून घेतल्यास फरशी नव्यासारखी स्वच्छ दिसते.

Web Title: How To Use Rice Water For Home Cleaning Don't waste rice water 4 amazing ways to use it at home How to Make and Use Rice Water for House Cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.