अन्न, वस्र आणि निवारा यानंतर कोणती जीवनावश्यक वस्तू आहे असे विचारले तर सध्या मोबाइल हे उत्तर मिळेल. दिवसातला सर्वाधिक काळ आपल्या हातात असणारा हा मोबाइल आपण सतत काही ना काही कारणाने वापरत असतो. कधी ऑफीसच्या कामानुमित्त तर कधी मित्रमैत्रीणींशी संपर्कात राहण्यासाठी नाहीतर बँकेचे व्यवहार किंवा एखादे तिकीट बुकींग करण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणाला मोबाइल लागतो. हल्ली शाळा- कॉलेज अटेंड करण्यासाठी लहान मुलांनाही सतत स्मार्टफोन लागतो(How to use smartphone)
सतत आपल्या हातात असणारा हा मोबाइल (Mobile phone) एक यंत्र असल्याने ठराविक काळानंतर तो थकतो आणि स्लो होतो. त्यालाच आपण मोबाइल हँग झालाय असे म्हणतो. वेगवेगळे अॅप्स डाऊनलोड केल्यामुळे किंवा कधी प्रमाणापेक्षा जास्त डेटा झाल्यामुळे कधी आणखी काही कारणाने हा मोबाइल हँग होतो. एकच मोबाइल बरीच वर्ष वापरल्यानेही काही वर्षानंतर तो हँग व्हायला लागतो. एकदा फोन हँग झाला की आपली सगळी कामे अडायला लागतात आणि आपली चिडचिड होते. पाहूयात मोबाइल हँग होऊ नये म्हणून काय करायचे....
१. मोबाइलची रॅम तपासा
मोबाइलची रॅम ही फोन फास्ट चालण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आपल्यातील अनेकांना तांत्रिक बाबतीत विशेष माहिती नसल्याने आपण मोबाइल खरेदी करताना त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण प्रामुख्याने कॅमेरा, मेमरी या गोष्टींकडे लक्ष द्तो. पण मोबाइलची रॅम चांगली असेल तर मोबाइल सारखा हँग होणार नाही. तुमचा फोन जुना झाला असेल आणि तो कमी रॅमचा असेल तर तुम्हाला नवीन मोबाइल खरेदी करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात ठेवा.
२. अनावश्यक अॅप्स डिलिट करा
आपण अनेकदा काही ना काही कामासाठी विविध अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करतो. ते ठराविक काम झाले की आपण अॅप बंद करतो पण ते अॅप डिलिट करायचे आपण विरसतो. अशी बरीच न लागणारी अॅप्लिकेशन्स आपल्या फोनमध्ये साठून राहतात आणि त्यामुळे मोबाइलची मेमरी वापरली जाते. त्यामुळे मोबाइल हँग व्हायला सुरुवात होते. पण वेळच्या वेळी न लागणारी अॅप्लिकेशन्स डिलीट केली तर फोन व्यवस्थित चालण्यास मदत होते.
३. अनावश्यक डेटा डिलीट करत राहा
हल्ली आपली बहुतांश कामे ही व्हॉटसअॅप किंवा तत्सम अॅप्लिकेशन्सद्वारे होत असतात. आपण व्हॉटसअॅपवर आलेले व्हिडिओ, फोटो इतर फाईल्स सतत डाऊनलोड करतो. ते आपल्या फोनच्या मेमरीमध्ये सेव्ह होत राहते. पण हे सगळे वेळच्यावेळी डिलीट करायचे राहून जाते. महिनोमहिने व्हिडीओ आणि फोटो देखील आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह होत जातात. मोबाईलमध्ये डेटा जास्त झाल्याने अनेक वेळा माबाईल हॅंग होतो. त्यामुळे वेळच्या वेळी मोबाइलमधला डेटा डिलीट करत राहा.
४. मोबाइल अपडेट करा
आपला स्मार्टफोन हा मायक्रोसॉफ्ट किंवा अॅपल अशा सिस्टीमवर कार्यरत असतो. या सिस्टीम ठराविक काळाने अपडेट कराव्या लागतात. आपल्याला अनेकदा मोबाइलवर अपडेटचा मेसेजही येतो. असा मेसेज आला की मोबाइल त्वरीत अपडेट करा. त्यामुळे फोन हँग न होता व्यवस्थित चालण्याची शक्यता जास्त असते.