सणावाराच्या दिवसात अनेक जण विविध प्रकारचे दागिने घालतात. सर्वत्र गणेशोत्सवाचा माहोल आहे. या दिवसात महिलावर्ग छान नटतात - सजतात. गळ्यात हार, हातात बांगड्या व पायात पैंजण घालून मिरवतात. बाकीचे दागिने थोडे धुतले की स्वच्छ होतात. पण पायातील चांदीचे पैंजण लवकर काळपट पडतात. काळपट पडलेले पैंजण पायाची शोभा कमी करतात. छम - छम करत जाणाऱ्या पायांवर सर्वांच्याच नजरा पडतात, त्यामुळे पैंजण स्वच्छ असायला हवे.
चांदीचे पैंजण सराफाकडे जाऊन स्वच्छ करण्यापेक्षा घरीच चकाचक करा. कमी वेळात - कमी मेहनत घेता आपण चांदीचे पैंजण स्वच्छ करू शकता. पैंजणावर चमक आणण्यासाठी कोणती ट्रिक उपयोगी पडेल पाहा(How to Use Toothpaste to Clean Silver Jewelry).
एक स्टेप काही मिनिटात पैंजण चकाचक
पैंजण स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य
टूथपेस्ट
बिघडलेले जुने घड्याळ फेकू नका, झटपट तयार करा ४ हटके शो पीस, घराची भिंत दिसेल सुंदर
पाणी
या पद्धतीने करा चांदीचे पैंजण स्वच्छ
फक्त ५ रुपयांचा बेकिंग सोडा आणा आणि कळकट घाणेरड्या उशा करा स्वच्छ, पाहा खास उपाय
सर्वप्रथम, एका प्लेटमध्ये चांदीचे पैंजण स्वच्छ धुवून घ्या. नंतर हाताने पैंजणावर टूथपेस्ट लावा. टूथपेस्टमधील असलेले घटक चांदीचे पैंजण स्वच्छ करण्यास मदत करतात. पैंजणाला टूथपेस्ट लावल्यानंतर थोडा वेळ तसेच ठेवा. १५ मिनिटानंतर जुन्या ब्रशने पैंजण घासून काढा. ४ - ५ मिनिटं पैंजण स्वच्छ घासून काढा. नंतर पाण्याने पैंजण स्वच्छ धुवून घ्या. व टॉवेलने लगेच पुसून काढा. अशा प्रकारे मेहनत न घेता पैंजण स्वच्छ होतील.