हिवाळ्याचे दिवस सुरू होण्याआधी चादरी आणि ब्लँकेट्स स्वच्छ करणं म्हणजे खूपच कठीण काम वाटतं. सतत पाण्याने धुतल्यामुळे याची क्वालिटी खराब होण्याचाही धोका असतो. (Diwali Home Cleaning) म्हणूनच लोक चादरी धुण्याऐवजी ड्रायक्लिन करतात. जास्त मेहनत न करता आणि ड्रायक्लिनसाठी पैसे न देता तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने बेडशीट, चादरी स्वच्छ करू शकता. (4 Amazing tricks to wash sheets, bed sheets without soaking)
सगळ्यात आधी चादरी झाडून त्यावरची धूळ काढून घ्या. यासाठी तुम्ही वॅक्युम क्लिनरचा वापर करू शकता. ब्लँकेट आणि चादरींवर अधिक धूळ बसते पण ती दिसून येत नाही म्हणून नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे.
चादरी कधीच इतर कपड्यांसह धुवून नका. नेहमी वेगवेगळ्या स्वच्छ करा. अनेक महिला चादरी इतर कपड्यांसह भिजवतात त्यामुळे चादरींचा रंग लागून कपडे खराब होण्याची शक्यता असते. तुम्ही चादरी स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करू शकता. (Cleaning Tips)
बेकींग सोडा शिंपडा
उशांचे कव्हर किंवा चादरींमधून दुर्गंध किंवा मॉईश्चर दूर करण्याासाठी किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेकींग सोड्याचा वापर करू शकता. बेकींग सोडा चादर किंवा ब्लँकेटवर छिंपडून १५ ते २० मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. वॅक्युम क्लिनरने क्लिन केल्यानंतर चादरी उन्हात वाळवून मग त्याचा वापर करा.
झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं
फॅब्रिक स्प्रे
फॅब्रिक फ्रेशर, फॅब्रिक सॅनिटायजर असे अनेक स्प्रे बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्हाला जास्त मेहनत न करता चादरी स्वच्छ करायच्या असतील तर ब्लँकेट डस्टींग नक्कीच करा.
घरात झुरळं-बारीक पिल्लांचा सुळसुळाट झालाय? फक्त १ उपाय, झुरळं कायमची घराबाहेर पळतील
चादरी उन्हात सुकवा
हा चादरी स्वच्छ करण्याचा एक उत्तम, प्रभावी उपाय आहे. चादरींना कुबट वास येत असेल तर न विसरता उन्हात ठेवा. पातळ लाकडाच्या काठीने अंथरूण झटका. यामुळे ब्लँकेट पुन्हा एकदा वापरसाठी तयार असतील.
न विसरता कव्हर घाला
अनेक घरांमध्ये अंथरूण, पांथरूणांना कव्हर लावले जात नाही. अशा निष्काळजीपणामुळे चादरी, ब्लँकेट्स लवकर खराब होण्याची शक्यता असते. खराब लहान मुलं असतील तर त्यावर कॉफी, चहा किंवा खाण्याचे कोणतेही पदार्थ पडल्यामुळे हट्टी डाग पडू शकतात. नेहमी कव्हर लावून ठेवले तरी चादरी, जड गोधड्या अजिबात खराब होणार नाहीत.