Join us

मातीच्या भांड्यांचा तेलकट वास जात नाही, बुरशीही येते? १ भन्नाट ट्रिक, मातीची भांडी स्वच्छ करण्याची पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 15:54 IST

How to wash clay utensils : Hack to deep cleaning your clay pots : Right way to Clean & Maintain Clay Pots : Best way to wash clay cookware : 1 Simple Way to Clean Earthen Pots and Pans at Home : मातीच्या भांड्यांचा तेलकट वास आणि बुरशी स्वच्छ करण्याचा खास उपाय...

पूर्वीच्या काळात स्वयंपाकासाठी शक्यतो मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे. परंतु बदलत्या काळानुसार मातीच्या भांड्यांचा वापर करण्याची पद्धत मागे पडत गेली. आता (How to wash clay utensils) सध्या आपण स्टेनलेसस्टील, काचेची भांडी, जर्मन अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनलेल्या भांड्यांचा वापर करतो. असे असले तरीही मातीच्या भांड्यात (1 Simple Way to Clean Earthen Pots and Pans at Home) स्वयंपाक करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते.

मातीच्या भांड्यात अन्नपदार्थ तयार करण्याचे अनेक फायदे असले तरीही त्यांची स्वच्छता ठेवणे (How to clean claypot or Mudpot after cooking) हे तितकेच कठीण काम असते. या भांड्याना वेळच्यावेळी धुवून, पुसून स्वच्छ केले नाही तर अशी मातीची भांडी लवकर खराब होतात. ही भांडी कालांतराने कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ बनवण्यायोग्य राहत नाही. मातीच्या भांड्यात आपण अनेक अन्नपदार्थ तयार करतो. यामुळे कालांतराने या भांडयाना तेलाचा कुबट दुर्गंध येऊ (Hack to deep cleaning your clay pots) लागतो. अशावेळी आपण ही मातीची भांडी वेळीच स्वच्छ करून ठेवली (Easy Ways To Clean Clay Utensils) पाहिजे नाहीतर या भांड्यांना बुरशी लागून ती खराब होऊ शकतात. यासाठीच, मातीच्या भांड्यांना येणारा तेलकट वास आणि बुरशी लागली असता ती घालवून पुन्हा मातीची भांडी नव्यासारखी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक पाहूयात. 

मातीच्या भांड्यांचा तेलकट वास आणि बुरशी घालवण्यासाठी उपाय...

मातीच्या भांड्यांचा तेलकट वास आणि बुरशी स्वच्छ कारण्याचा हा सोपा उपाय  prajaktasalvevlogs या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मातीच्या भांड्यांना येणारा तेलकट वास आणि बुरशी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी २ टेबलस्पून बेकिंग सोडा, मीठ, १ ते २ लिंबाचा रस आणि त्याच लिंबाची सालं इतके साहित्य लागणार आहे.  

१. सगळ्यांत आधी मातीच्या भांड्यात संपूर्णपणे पाणी भरून ते भांड गॅसच्या मध्यम आचेवर ठेवून द्यावे. आता पाणी थोडे गरम होऊ द्यावे. 

२. मातीच्या भांड्यातील पाणी गरम झाल्यावर त्यात प्रत्येकी २ टेबलस्पून बेकिंग सोडा, मीठ, १ ते २ लिंबाचा रस आणि त्याच लिंबाची सालं यात घालावीत. 

३. आता हे सगळे पदार्थ गरम पाण्यांत घातल्यावर पाण्याला एक उकळी येईपर्यंत भांडं तसेच मध्यम आचेवर झाकून ठेवून द्यावे. 

४. पाणी व्यवस्थित उकळून गरम झाल्यावर गॅस बंद करून घ्यावा. मग ५ ते १० मिनिटे पाणी थोडे थंड होऊ द्यावे. पाणी थोडे थंड झाल्यावर हे पाणी ओतून द्यावे. 

मसाला ताक प्या कुठेही-कधीही! ही घ्या इन्स्टंट मसाला ताक क्यूब रेसिपी, पोटाला थंडावा रोज...

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये फार उकडते ? ६ टिप्स, घाम आणि उकाड्यापासून सुटका...

५. त्यानंतर बेसन पीठ आणि सॉफ्ट स्पंजच्या मदतीने हे भांडं स्वच्छ घासून घ्याव. बेसन पीठ स्पंजवर घेऊन हलकेच स्पंजने हे भांडं घासून घ्यावं. 

६. त्यानंतर अर्धा तास हे भांड असच ठेवावं. मग पाण्याने भांडं स्वच्छ धुवून घ्यावे. 

७. स्वच्छ धुतलेली ही मातीची भांडी २ ते ३ दिवस कडक उन्हांत संपूर्णपणे सुकेपर्यंत वाळवून घ्यावीत. 

अशाप्रकारे आपण मातीच्या भांड्यांना येणारा तेलकट वास आणि बुरशी अगदी सहजरित्या काढू शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नकिचन टिप्सस्वच्छता टिप्स