Join us  

वॉशिंग मशिनचीही गरज नाही, झटपट धुता येतील बादलीभर कपडे-लक्षात ठेवा ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 4:09 PM

How to Wash Clothes without a Washing Machine : वॉशिंग मशिनशिवाय एकाच दिवशी भरपूर कपडे कसे धुवायचे?

घरातील सर्व कामांपैकी सर्वात कंटाळवाणे आणि थकवणारे काम म्हणजे कपडे धुणे (Cleaning Tips). सध्या अनेकांच्या घरामध्ये वॉशिंग मशिन असतेच. पण वॉशिंग मशिन बिघडले तर? अशावेळी आपल्याला हातानेच कपडे धुवावे लागतात (Washing Machine). वॉशिंग मशिनशिवाय एकाच दिवशी भरपूर कपडे धुणे हे खूप चॅलेंजिंग काम आहे (Cleaning Clothes).

डोंगराप्रमाणे कपड्यांचा ढिग पाहून आपल्याला धडकीच भरते. कितीही लवकर आटोपण्याचा प्रयत्न केला तरी, हाताने कपडे धुताना अर्धा तास तरी मोडतोच. कपडे जर लवकर धुवून व्हावे असं वाटत असेल तर, काही बेसिक वॉशिंग हॅक्स फॉलो करून पाहा. अगदी काही मिनिटात कपडे निघतील चकाचक(How to Wash Clothes without a Washing Machine).

कपड्यांचे वर्गीकरण करा

कपडे वेगाने धुण्याची पहिली स्टेप म्हणजे त्यांचे वर्गीकरण करणे. अनेकदा एकत्र धुतल्यानंतर कपडे व्यवस्थित स्वच्छ निघत नाही, आणि धुताना वेगळे करायला बराच वेळही जातो. त्यामुळे ते आधीच करून घेणं चांगलं. यासाठी रंगीत कपड्यांपासून पांढरे कपडे वेगळे करावेत. यासोबत ज्या कपड्यातून रंग सुटतो, ते कपडे अगोदरच वेगळे करा.

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात; पचनक्रिया बिघडेलच- फुफ्फुसावरही होईल परिणाम

धुण्यापूर्वी कपडे भिजत घाला

कपडे धुण्यापूर्वी भिजत घालायला विसरू नका. कपडे कोमट पाण्यात भिजवण्याचा प्रयत्न करा. अगदी घाणेरडे कपडे सुद्धा गरम पाण्यामुळे सहज साफ होतात. डिटर्जंट गरम पाण्यात विरघळून घ्या आणि कपडे सुमारे १० मिनिटे भिजण्यासाठी सोडा. नंतर कपड्यांचा साबण लावून धुवून घ्या. मिनिटात कपडे धुवून होतील.

चमचाभर मध आणि 'या' काळ्या बियांचा उपाय, वजनही होईल कमी आणि त्वचाही चमकेल

या गोष्टी लक्षात ठेवा

कपडे धुताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. अनेकदा बाथरूम घाण झाल्यामुळे कपड्यांवर डाग पडतात. त्यामुळे नेहमी बाथरूम नीट स्वच्छ करा आणि मग कपडे धुण्यासाठी बसा. रंग सोडणारे कपडे नेहमी शेवटी धुवावे. कपडे वेगवेगळे सुकत घाला. एकावर एक कपडे सुकत घालू नका. पांढऱ्या कपडे रंगीत कपड्यांसोबत वाळत घालू नका.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल