Join us  

पहिल्या धुण्यातच कपड्यांचा रंग गेला, फिका पडला? धुताना पाण्यात टाका १ गोष्ट, रंग जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 9:16 PM

How to Wash Colored Clothes Without Color Bleeding : कपडे धुताना पाण्यात ३ पैकी १ गोष्ट जरी घातली तरी कपड्यांचे रंग फिके होणार नाहीत.

आपण विविध प्रकारचे, विविध रंगाचे आणि विविध फॅब्रिकच्या कपड्यांचा वापर करतो. दिवसभर कपडे घातल्यानंतर आपण त्याच दिवशी धुतो किंवा दुसऱ्या दिवशी पाण्यात डिटर्जेंट मिसळून त्यात कपडे भिजत ठेवून धुतो. यामुळे कपड्यांवरील डाग सहज आणि लवकर निघतात. पण अनेकदा कपड्यातून रंगही निघते. कपड्यातून जेव्हा रंग निघतो, तेव्हा कापड आणखी फिकट दिसू लागते.

बऱ्याचदा वारंवार कपडे धुवून त्याचा रंग फिका पडतो. पण जर पहिल्या धुलाईतच त्याचा रंग फिका पडत असेल तर, पैसे वाया गेल्याचं आणखीनचं वाईट वाटतं. बऱ्याचदा ब्रॅण्डेड कपड्यांबाबतही असेच  घडते. जर तुमच्याही कपड्यांचा रंग पहिल्या धुलाईतच फिका पडत असेल तर, तुमची कपडे धुण्याची पद्धत चुकत तर नाही ना? हे पाहून घ्या.  शिवाय कपडे धुताना कोणती खरबरदारी घ्यावी पाहा(How to Wash Colored Clothes Without Color Bleeding).

कपडे धुताना त्यातून रंग जाऊ नये म्हणून उपाय

मीठ

मिठाचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, कपड्यातील रंग निघू नये यासाठीही करता येऊ शकते. यासाठी एका भांड्यात २ ते ३ मग पाणी घ्या. त्यात ३ वाट्या मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर ३ तासांसाठी त्यात कपडे भिजत ठेवा. ३ तासानंतर त्यातून कपड्यातील अतिरिक्त रंग निघून गेल्याचं पाहायला मिळेल. यानंतर पुन्हा त्यातून रंग निघणार नाही.

विसरभोळेपणा वाढतोय का, नावं-गोष्टी लक्षात राहत नाहीत? ५ टिप्स-स्मरणशक्ती वाढेल कायमची

व्हिनेगर

कपडे धुताना आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. व्हिनेगरच्या वापराने कपड्यातील रंग निघणार नाही. यासाठी बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात २ ते ३ चमचे व्हिनेगर घालून मिक्स करा. नंतर त्यात कपडे भिजत ठेवा. थोड्या वेळानंतर कपडे धुवून घ्या.

तुरटी

तुरटीच्या वापरामुळेही कपड्यातील रंग फिका पडणार नाही. यासाठी बादलीत पाणी घ्या त्यात ७ ते ८ चमचे मीठ, ४ ते ५ चमचे तुरटीची पावडर घालून मिक्स करा. नंतर त्यात कपडे घालून भिजत ठेवा. काही वेळानंतर साध्या पाण्याने कपडे स्वच्छ धुवून घ्या. यामुळे कपडे मऊ आणि सॉफ्ट राहतील.

५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं

- कपडे धुताना नेहमी थंड पाण्याचा वापर करा. गरम पाण्याने धुतल्याने कपड्याचा रंग फिका पडतो. शिवाय कपडे नेहमी जास्त अधिक सूर्यप्रकाशात वाळत घालू नका.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल