Join us  

एकाच धुण्यात कॉटन कपड्यांचा रंग फिका पडला? धुताना पाण्यात मिसळा १ गोष्ट; कपडे दिसतील कायम नवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 3:23 PM

How To Wash Cotton Clothes In The Right Way : कॉटन कपड्यांचा रंग कसा ठेवावा कायम?

उन्हाळ्यात बरेच जण कॉटनचे कपडे घालतात. कॉटनच्या कपड्यांमध्ये आरामदायी वाटते. कारण घाम जरी आला तरी, कापड शोषून घेते. ज्यामुळे शरीर गरमीतही थंड राहते. सध्या कॉटनच्या कपड्यांमध्ये विविध प्रकारचे लेटेस्ट डिझाईन बाजारात उपलब्ध आहे. हवे तशा रंगाचे आणि वेगवेगळ्या फॅशनेबल डिझाईनचे आपण कपडे घालू शकतो. पण बऱ्याचदा नवीन सुती कपड्यांमधून धुतल्यानंतर रंग जात राहतो (Clothes Cleaning). त्यामुळे नवे कपडेही लवकरच जुने दिसू लागतात (Washing Tips).

जर नवीन कॉटनचे कपडे एका धुण्यात जुने दिसत असेल तर, धुताना काही विशेष टिप्स लक्षात ठेवा. यामुळे कपड्यांचा रंग कधीही फिका पडणार नाही(How To Wash Cotton Clothes In The Right Way).

कॉटनच्या कपड्यांचा रंग धुतल्यानंतर फिका पडू नये म्हणून..

मीठ वापरा

मिठाच्या वापराने कपड्यांचा रंग फिका होणार नाही. यासाठी बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात ५० ते ६० ग्रॅम तुरटी पावडर आणि २ चमचे मीठ घाला. नंतर त्यात कपडे पसरवून भिजत घाला. त्यात इतर कपडे घालू नका, अन्यथा कपड्यांचा रंग एकमेकांना लागू शकतो. या पाण्याच्या मिश्रणात कपडे किमान २ तास राहू द्या. शेवटी हे कपडे मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ पाण्यात धुवावेत.

रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ

व्हिनेगर

सूती कपडे मीठ आणि तुरटीच्या पाण्याने धुतल्यानंतर व्हिनेगरचे पाणी वापरावे. असे केल्याने कपड्यांचा रंग जाणार नाही. यासाठी कपडे व्हिनेगरच्या पाण्यात किमान अर्धा तास भिजवून ठेवा. नंतर कपडे उन्हात न वाळवता सावलीत सुकवण्यासाठी  घाला.

कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

फॅब्रिक डाय वापरा

वारंवार कपडे धुतल्यानंतरही त्याचा रंग फिका पडू शकतो. ज्यामुळे कपडे फार जुने दिसू लागतात. चारचौघात आपण हे कपडे घालणं टाळतो. हे कपडे फेकून देण्याऐवजी आपण फॅब्रिक डायचा वापर करू शकता. यासाठी कपडे धुताना पाण्यात फॅब्रिक डाय मिसळा. जे बाजारात सहज उपलब्ध आहे. या ट्रिकमुळे कपडे दीर्घकाळ नव्यासारखे दिसतील. शिवाय कपड्यांचा रंग फिकाही पडणार नाही.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल