हल्ली खिडक्यांना, दरवाजांना जे पडदे आपण लावतो ते रॉडमध्ये अडकविण्यासाठी पडद्यांना वरच्या बाजूला छोटे छोटे रिंग असतात. या रिंगमुळे पडद्यांना खूप छान लूक येतो. पण हे पडदे धुवावे कसे, असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो (How To Wash Curtains With Ring?). काही जणी पडद्यांना लावलेले सगळे रिंग काढतात आणि पडदे धुतात. त्यानंतर पुन्हा पडद्यांना रिंग लावून टाकतात. पण हे काम खूपच त्रासदायक आहे (how to wash curtains with hook). असं केल्याने बऱ्याचदा पडद्यांच्या रिंग तुटतात. म्हणूनच आता रिंग असणारे पडदे कसे धुवायचे ते बघा... (can we wash curtains with eyelets in a washing machine?)
रिंग असणारे पडदे कसे धुवायचे?
१. पहिली पद्धत
ही पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी पडद्याच्या सगळ्या रिंग जवळजवळ करून एकमेकांना जोडून घ्या. या रिंगमध्ये एक दोरी टाका आणि सगळ्या रिंग त्या दोरीने बांधून घ्या. आता या रिंगवर एक कापडी पिशवी लावा.
'पुन्हा असं करशील तर याद राख', असं म्हणत तुम्हीही मुलांना दम देता? तज्ज्ञ सांगतात.....
त्या पिशवीचं खालचं टोक बांधून टाका. म्हणजेच पिशवीमध्ये टाकून पडद्याचे रिंग पॅक करा. आता हे पडदे मशीनमध्ये धुवायला टाका. यामुळे रिंग तुटणार नाहीत. किंवा मशिनमध्येही घासले जाणार नाहीत.
२. दुसरी पद्धत
या पद्धतीमध्ये एक काठी घ्या. त्या काठीला पडदा अडकवा. पडद्याचे सगळे रिंग जवळजवळ करून घ्या.
पाय धुतल्यानंतर तुमच्या शरीरावर होतो 'हा' परिणाम, बाहेरून आल्याआल्या लगेच पाय धुवा कारण
आता ही काठी मशिनवर आडवी ठेवा. ती अशा पद्धतीने ठेवावी की पडद्याचा खालचा भाग मशिनमध्ये जाईल आणि रिंग मात्र वरच्या काठीलाच अडकलेले राहतील. यानंतर मशिन सुरू करा आणि पडदे धुऊन टाका.