घरात लवकर घाण होणारी खोली म्हणजे किचन. किचनमध्ये दिवसातून तीन वेळा अन्न शिजवले जाते. जेवण तयार करताना तेलाचे डाग, भाजीची वाफ या सगळ्यामुळे किचनच्या टाईल्स अथवा भिंतीवर चिकटपणा साचतो. बहुतेक लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी कापड वापरतात. पण या कापडाचा वारंवार वापर केल्याने लवकर खराब होते. यामुळे किचन टॉवेल काळपट, चिकट आणि कडक होतो.
धुतल्यानंतरही त्यातील उग्र वास निघून जात नाही. त्यावर अनेक प्रकारचे जंतू निर्माण होतात. जर आपल्याला चिकट-कळकट किचन टॉवेल स्वच्छ करायचं असेल तर, एक रुपयाच्या शाम्पूचा वापर करून पाहा. शाम्पू फक्त केस धुण्यासाठी नसून, किचनच्या अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो(How to wash dirty kitchen towels by using Shampoo).
सध्या ज्याची वेड्यासारखी क्रेझ आहे ते पर्पल डाएट नक्की काय आहे? जो तो काय ‘जांभळ्या’ गोष्टी खातोय?
एक रुपयाच्या शाम्पूने स्वच्छ करा किचनचा कळकट टॉवेल
किचनचा चिकट टॉवेल स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत कोमट पाणी घ्या, त्यात एक रुपयाचा शाम्पू घालून मिक्स करा. आता या पाण्यात किचन टॉवेल १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. १५ मिनिटांनंतर पाण्यातून कापड काढा आणि ब्रशच्या मदतीने घासून घ्या. यानंतर कापड स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे कापडावरील उग्र वास, चिकटपणा निघून जाईल.
फक्त ५ मिनिटं रोज घरात एकच व्यायाम करा, पोट-कंबर-पाय सगळीकडची चरबी होईल झटपट कमी
डिटर्जंटने साफ करा
किचन टॉवल साफ करण्यासाठी आपण डिटर्जेंटचाही वापर करू शकता. यासाठी एका वाटीत कोमट पाणी घ्या, त्यात डिटर्जेंट मिक्स करा. तयार पाण्यात किचन टॉवेल १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. टॉवल भिजल्यानंतर टॉवेल ब्रशने घासून काढा, त्यानंतर सामान्य पाण्याने धुवून घ्या. यामुळे टॉवेल स्वच्छ आणि जंतूमुक्त होईल.