Join us  

भांडी घासायची पण पाणीच नाही? ४ ट्रिक्स- पाण्यानं न विसळताही भांडी होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 5:10 PM

How to Wash Dishes When There's No Running Water : खरकटी भांडी विसळून ठेवायलाही पाणी नसेल तर पाण्याशिवाय घासा भांडी झटपट

दररोज भांडी, लादी, कपडे ही कामे करावीच लागतात. आपण रोज जेवतो, त्यामुळे अनेकांच्या घरात ३ वेळची भांडी किचन सिंकमध्ये पडतात. काहींना भांडी घासण्याचा कंटाळा येतो, तर काही जण आवडीने भांडी घासतात. जेवल्यानंतर भांडी घाण होतातच. त्यामुळे योग्य वेळी भांडी स्वच्छ घासून काढणं गरजेचं आहे.

जर वेळेवर भांडी घासली नाही तर, त्यातून दुर्गंधी येऊ लागते. शिवाय बॅक्टेरिया वाढू लागतात. ज्यामुळे घरात रोगराई पसरते. पण अनेकदा नळाला पाणी येत नाही, टाकीतलं पाणी संपते. अशा वेळी भांडी पडून राहतात. पाण्याशिवाय भांडी धुतली जात नाही. जर आपल्याला पाण्याशिवाय भांडी स्वच्छ करायची असतील तर, ४ भन्नाट ट्रिक्सचा वापर करून पाहा. या ट्रिक्समुळे भांडी चकाचक स्वच्छ होतील(How to Wash Dishes When There's No Running Water).

लाकडाची राख

जर घरात पाणी नसेल तर राखेचा वापर करून भांडी स्वच्छ करा. यासाठी खरकट्या भांड्यांमधील उरलेले अन्न आधी काढून घ्या. त्यानंतर एका भांड्यात लाकडाची राख घ्या, व त्या राखेने भांडी स्वच्छ घासून काढा. जोपर्यंत तेलाचे व जेवणाचे डाग पूर्णपणे निघून जात नाही, तोपर्यंत घासा यानंतर टिश्यू पेपर किंवा कापडाने भांडी स्वच्छ पुसून काढा. आपण राखेऐवजी भुसा देखील वापरू शकता.

परफेक्ट गरबा करायचाय? लक्षात ठेवा ५ सोप्या स्टेप्स, गरब्यात तुमच्यावरुन कुणाची नजर हटणार नाही

बेकिंग सोडा

बर्‍याचदा जेवण करताना भांडं जळतं, जळालेलं भांडं साबणानेही लवकर साफ होत नाही. अशा स्थितीत बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी प्रथम भांडी गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यावर बेकिंग सोडा शिंपडा आणि थोडा वेळ तसेच राहूद्या. शेवटी स्पंजच्या मदतीने भांडी घासून स्वच्छ करा.

व्हिनेगर

पाण्याशिवाय भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम, खरकट्या भांड्यांमधील उरलेले अन्न टिश्यू पेपरने काढून टाका. नंतर भांड्यावर व्हिनेगर स्प्रे करा. ५ ते १० मिनिटांसाठी व्हिनेगर भांड्यांवर तसेच ठेवा. त्यानंतर टिश्यू पेपरने भांडी स्वच्छ पुसून काढा. असं केल्याने भांडी तर स्वच्छ होतीलच शिवाय भांड्यांमधून दुर्गंधीही येणार नाही.

दळून जास्त आलं तर पिठात अळ्या-किडे होण्याची भीती वाटते? ४ सोप्या टिप्स- पीठ टिकेल भरपूर

लिंबू

लिंबाचा वापर करून आपण भांडी स्वच्छ करू शकता. यासाठी खरकटी भांडी टिश्यू पेपरने स्वच्छ करून घ्या. नंतर एका वाटीमध्ये ३ चमचे बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. नंतर स्पंजच्या मदतीने भांडी नीट घासून काढा. ५ मिनिटानंतर टिश्यू पेपर किंवा कापडाने भांडी स्वच्छ पुसून काढा. लिंबाच्या रसामुळे भांड्यातील चिकट डाग मेहनत न घेता निघतील.  

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स