Join us  

जीन्स धुताना ३ चुका टाळा, जीन्स लवकर खराब होणार नाही, दिसेल अनेक वर्षे नव्यासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 12:48 PM

How To Wash Jeans Properly: रफ ॲण्ड टफ वाटणाऱ्या जीन्सची धुलाई मात्र अगदी काळजीपुर्वक करावी लगते... तरची ती जास्त दिवस टिकते आणि अगदी नव्यासारखी दिसते. 

ठळक मुद्देआपली आवडती जीन्स अधिक काळ टिकावी, चांगली फ्रेश दिसावी म्हणून ती धुताना मात्र थोडी काळजी घेतली पाहिजे

कुर्ता असो, टॉप असो किंवा मग टी- शर्ट असो... सगळ्यांवर अगदी परफेक्ट मॅच होते ती आपली जीन्स. काळी, निळी किंवा ग्रे रंगाची एकच जीन्स असली तरी तिच्यावर वेगवेगळे ५ ते ६ टॉप अगदी सहज चालून जातात. म्हणूनच तर हल्ली तरुणाई अगदी सर्रासपणे जीन्स घालते. तरुणाईच नाही तर आजकाल प्रौढ व्यक्ती किंवा अगदी वयस्कर मंडळीही आवडीने जीन्स घालताना दिसत आहेत (How to take care of denim?). आपली आवडती जीन्स अधिक काळ टिकावी, चांगली फ्रेश दिसावी म्हणून ती धुताना मात्र थोडी काळजी घेतली पाहिजे आणि काही प्रमुख चुका टाळल्या पाहिजेत. (Avoid 3 mistakes while washing jeans)

 

जीन्स धुताना काय काळजी घ्यावी...१. आदळ आपट नकोजीन्स आपल्याला दिसायला एकदम दणकट दिसते. पण म्हणून ती धुतानाही तशीच जोरजोरात धुवावी असं मात्र मुळीच नाही. त्या उलट जीन्स अगदी हळूवारपणे धुतली पाहिजे. जीन्स दगडावर आपटू नये आणि ब्रशने घासून जोरजोरात धुवूही नये.

 

प्या ५ ज्यूस, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! महागड्या क्रिम चोपडण्यापेक्षाही सोपा उपाय

२. सुलट जीन्स धुवू नकाजीन्स कधीही सुलटी धुवू नये. जीन्स धुताना ती नेहमी उलटी करावी. म्हणजेच जीन्सच्या आतली बाजू बाहेर काढावी आणि नंतरच जीन्स धुवावी. याचं कारण असं की जीन्स जर सरळ किंवा सुलटी धुतली तर साबण, डिटर्जंट यामुळे ती भुरकट दिसू शकते. 

 

३. जीन्स पिळू नयेएरवी आपण कपडे धुतले की ते पिळून त्याच्यातलं पाणी काढून घेतो. पण जीन्सच्या बाबतीत असं करू नये. जीन्स जोरजोरात पिळू नये. कारण ती पिळली तर तिच्यातला घट्टपणा निघून जातो आणि ती सैलसर होऊन जाते.

 

जीन्स धुण्याची योग्य पद्धतजीन्स धुण्यासाठी एका बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये उलट करून जीन्स अर्धा तास भिजत ठेवा.

घरात जुन्या कपड्यांचा ढिग पडलाय? बघा ६ उपाय, जुने कपडेही नव्यानं वापरु शकता..

त्यानंतर चांगल्या पाण्यातून खळबळून घ्या आणि हॅंगरला लावून उन्हात वाळवत ठेवा. मशिनमध्ये धुणार असात तर नेहमी सॉफ्ट मोडवर ठेवा आणि ड्रायरमधून पिळू नका. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी