लेगिंग्ज हा आता बहुसंख्य स्त्रियांच्या कपाटातला एक अविभाज्य कपडा झाला आहे. अगदी शाळकरी मुलींपासून ते वयस्कर आजीबाईंपर्यंत कित्येकजणी लेगिंग्ज वापरतात. कॅज्युअली बाहेर जायला ती जशी सोयिस्कर असते, तितकीच परफेक्ट ती ऑफिस आणि कॉलेजसाठीही असते. म्हणूनच तर बहुतांश जणी हल्ली लेंगिग्ज वापरतात (4 tips for the long life of leggings). बऱ्याच जणींना तर प्रवासातही लेंगिग्ज घालणेच जास्त आरामदायी वाटते. पण कितीही महागाची लेगिंग्ज घेतली तरी ती ५ ते ६ महिन्यांतच खराब होऊन जाते, अशी अनेक जणींची तक्रार असते. (Leggings loosen up quickly - sagging at the knee?)
लेगिंग्ज लवकर सैल पडून खराब होऊ नये म्हणून उपाय
तुमच्याही लेगिंग्ज जास्त दिवस टिकत नसतील, सैलसर पडून त्यांची फिटिंग बिघडून जात असेल तर असं होऊ नये, म्हणून काय करावं, हे एकदा बघा...
बघा मोत्याच्या चिंचपेटीचे वेगवेगळे प्रकार, लग्नकार्यात असा एक तरी दागिना आपल्याकडे पाहिजेच...
लेगिंग्जचा लाईफस्पॅन वाढवायचा असेल तर त्यासाठीची १ महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेगिंग्ज वारंवार धुणे टाळा. ज्याप्रमाणे घातल्यावर लगेचच आपण जीन्स धूत नाही, त्याचप्रमाणे लेगिंग्जही लगेच धुवू नये. ४ ते ५ वापरानंतर एकदा लेगिंग्ज धुवावी.
लेगिंग्ज धुताना ती कधीही दगडावर आपटून किंवा ब्रशने घासून धुवू नये. ती बादलीमध्ये डिटर्जंटच्या पाण्यात काही मिनिटे भिजत ठेवा आणि नंतर हलक्या हाताने चोळून धुवा.
लेगिंग्ज जर मशिनमध्ये धुणार असाल तर सगळ्यात आधी मशिन सॉफ्ट मोडवर करा. हार्ड वॉशिंग करणे टाळा.
आलिया- अनुष्कासारखं परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज शिवायचं? १ सोपा उपाय- छान फिनिशिंग मिळेल
लेगिंग्ज धुतल्यानंतर ती अजिबात घट्ट पिळू नका. यामुळे तिचा कपडा सैलसर पडतो. हलक्या हाताने अलगद पिळून तिच्यातले पाणी काढून टाका आणि नंतर ती दोरीवर वाळायला टाका.
लेगिंग्ज धुताना आतली बाजू नेहमी बाहेर असावी. यामुळे लेगिंग्जच्या बाहेरच्या बाजुवर बुंदके येणार नाहीत, तसेच कपड्याची चमकही कमी होणार नाही.