Lokmat Sakhi >Social Viral > मेहनत न करता वॉशिंग मशीनमध्ये उशा धुण्याची पाहा भन्नाट ट्रिक, हट्टी डाग गायब-उशी दिसेल नवीकोरी...

मेहनत न करता वॉशिंग मशीनमध्ये उशा धुण्याची पाहा भन्नाट ट्रिक, हट्टी डाग गायब-उशी दिसेल नवीकोरी...

How To Wash Pillows In Washing Machine : How to Wash Pillows the Right Way : How To Clean Your Pillow : Easy Guide on How to Wash Pillows In A Washing Machine : सतत वापरुन उशा खूपच खराब होतात, अशावेळी जास्तीचे कष्ट न घेता उशी धुण्याची खास आयडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2024 19:26 IST2024-12-12T18:35:38+5:302024-12-12T19:26:44+5:30

How To Wash Pillows In Washing Machine : How to Wash Pillows the Right Way : How To Clean Your Pillow : Easy Guide on How to Wash Pillows In A Washing Machine : सतत वापरुन उशा खूपच खराब होतात, अशावेळी जास्तीचे कष्ट न घेता उशी धुण्याची खास आयडिया...

How To Wash Pillows In Washing Machine Easy Guide on How to Wash Pillows In A Washing Machine How to Wash Pillows the Right Way | मेहनत न करता वॉशिंग मशीनमध्ये उशा धुण्याची पाहा भन्नाट ट्रिक, हट्टी डाग गायब-उशी दिसेल नवीकोरी...

मेहनत न करता वॉशिंग मशीनमध्ये उशा धुण्याची पाहा भन्नाट ट्रिक, हट्टी डाग गायब-उशी दिसेल नवीकोरी...

उशी ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला रोज झोपताना लागतेच. उशी शिवाय काहीजणांना झोपच येत नाही. रोजच्या वापरातील उशी सतत वापरुन त्यावर तेलकट काळेकुट्ट डाग पडतात. असे डाग वेळीच स्वच्छ केले नाही तर या उशांमधून कुबट, घाणेरडी दुर्गंधी येऊ लागते. उशांवरचे (How to wash pillows in washing machine properly) कव्हर्स, गाद्यांवरचे (How To Clean Your Pillow) बेडशीट आपण नियमितपणे धुवून स्वच्छ करतो. पण बऱ्याचदा बेडशीटवर किंवा उशीवर काही पदार्थ सांडले तर त्याचे डाग मात्र उशांवर, गाद्यांवर पडतात आणि मग त्या धुता येत नसल्याने ते डाग वर्षानुवर्षे (How to Wash Pillows the Right Way) तसेच राहतात. एखाद- दुसरा डाग असेल तर तो दिसतही नाही. पण वारंवार वेगवेगळे डाग पडले तर मात्र ती उशी किंवा गादी अगदीच कळकट आणि घाण वाटू लागते(Easy Guide on How to Wash Pillows In A Washing Machine)

आपण डोक्याला तेल लावून या उशा डोक्याखाली घेतो, त्याचबरोबर आपला घाम अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या नेहमीच्या उशीवर तेलकट - चिकट, मेणचट डाग पडतात. यातही उशी जर पांढऱ्याशुभ्र रंगाची असेल तर ती लगेच काही दिवसांतच मळकी किंवा डाग पडून जुनी दिसू लागते. याचबरोबर, उशा आपण वारंवार धुवू शकत नाही. त्यामुळे अशा रोजच्या वापरातल्या पांढऱ्याशुभ्र उशांवरचे डाग काढण्यासाठी आपण या उशा वारंवार हातांनी रगडून धूत बसतो. परंतु जर आपल्याला फारशी मेहेनत न घेता अगदी झटपट या उशांवरचे तेलकट डाग काढायचे असतील तर आपण वॉशिंग मशीनमध्ये देखील या उशा स्वच्छ धुवू शकतो. यासाठी वॉशिंग मशीनमध्ये पांढऱ्याशुभ्र उशा धुण्याची सोपी ट्रिक पाहूयात. 

मळकट - घाणेरड्या उशा वॉशिंग मशीनमध्ये कशा धुवाव्यात? 

पांढऱ्याशुभ्र उशा सतत वापरुन त्यावर तेलकट - चिकट, मेणचट डाग पडतात. असे डाग वेळीच स्वच्छ केले नाही तर त्या उशांमधून कुबट दुर्गंधी येऊ लागते. असे होऊ नये यासाठी आपण एक झटपट सोपी ट्रिक वापरुन फारशी मेहेनत न घेता मळक्या उशा वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकतो. शक्यतो, या पांढऱ्याशुभ्र उशांवरचे डाग घालवण्यासाठी आपण डिटर्जंटच्या पाण्यांत आधी  ३ ते ४ तास उशा भिजत ठेवतो किंवा हातांनी रगडून धुतो. परंतु आपण फार  मेहेनत न घेता देखील या उशा स्वच्छ करु शकतो.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

यासाठी ३ ते ४ टेबसलस्पून डिटर्जंट पावडर, २ टेबलस्पून व्हिनेगर, १ शाम्पू पाऊच, २ टेबलस्पून लिक्विड आला इतके साहित्य लागणार आहे. श्रीप्रा राय यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून वॉशिंग मशीनमध्ये उशा सहज सोप्या पद्धतीने कशा धुवाव्यात याबद्दलची अधिक माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.   

म्हणे ‘अकाय’ म्हणजे काय? २०२४मध्ये लोकांनी सर्वाधिक गुगल केलं विराट-अनुष्काच्या लेकाचं नाव कारण...


फक्त कपभर मटारचे करा चविष्ट धिरडे, हिवाळ्यातला झटपट पौष्टिक हिरवागार कुरकुरीत नाश्ता-सोपी रेसिपी...

सर्वप्रथम या मळक्या उशा वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये ठेवाव्यात. त्यानंतर, त्यात डिटर्जंट पावडर, व्हिनेगर, शाम्पू पाऊच, लिक्विड आला घालावे. आता नेहमीप्रमाणे आपण कपडे धुतो त्याच मोडवर मशीन सेट करुन २ ते ३ वेळा धुवून घ्यावे. त्यानंतर मशीनमध्ये स्वच्छ पाणी भरुन या स्वच्छ पाण्यात २ वेळा उशा स्वच्छ धुवून घ्याव्यात. 

वॉशिंग मशीनमध्ये उशा धुताना लक्षात ठेवा... 

१. वॉशिंग मशीनमध्ये एकावेळी फक्त दोनच उशा धुवायला टाकल्यास अधिक चांगली स्वच्छता होईल. 

२. वॉशिंग मशीनमध्ये उशा धूत असताना इतर कपडे धुवायला टाकण्याची चूक करु नका. 

३. जर तुमच्या उशा फारच नाजूक असतील किंवा त्यांचे कापड पातळ असेल तर मशीनचा डेलिकेट मोड ऑन करायला विसरु नका.

Web Title: How To Wash Pillows In Washing Machine Easy Guide on How to Wash Pillows In A Washing Machine How to Wash Pillows the Right Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.