सिल्कच्या साड्या पुर्वीपासूनच फॅशनचा ट्रेंड बनल्या आहेत. सिल्कच्या साड्या सेलिब्रिटींच्या वॉर्डरोबमध्येही दिसून येतात. मार्केटमध्ये सिल्कच्या साड्यांची बरीच व्हरायटी उपलब्ध असते. पण या साड्या वर्षानुवर्ष मेंटेन करून ठेवणं फार कठीण असतं. ( Tips On How To Clean Your Silk Saree) सिल्कच्या साड्या डेलिकेट आणि सेंसिटिव्ह फॅब्रिकच्या असतात. (Silk Saree Washing Tips) म्हणून जास्तीत जास्त लोक या साड्या घरी न धुता बाहेर ड्राय क्लिन करण्यासाठी देतात. (How to Wash Silk Clothes at Home) सिल्कच्या साड्या घरी धुताना त्या व्यवस्थित धुतल्या जातील की नाही अशी शंका अनेकांच्या मनात असते. काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही सिल्कच्या साड्या घरच्याघरी धुवू शकता. (How to Wash Silk Sarees at Home)
१) आधी पॅच टेस्ट करा
सिल्कची साडी धुण्याआधी पॅच टेस्ट करणं महत्वाचे असते. यासाठी सगळ्यात आधी डिटर्जेंट आणि पाण्याचे लिक्विड तयार करा. नंतर यात कॉटनचे कापड भिजवून साडीच्या थोड्या भागावर घाला. जर रंग निघत नसेल तर तुम्ही साडी यात साडी धुवू शकता.
अचानक दूध फाटलं तर ५ मिनिटांत करा हलवाईस्टाईल सुपर सॉफ्ट बर्फी; तोंडात टाकताच विरळेल
२) सिल्कची साडी धुण्यासाठी असं मिश्रण तयार करा
ही साडी धुण्यासाठी माईल्ड लिक्विड डिटर्जेंटचा वापर करू सकता. तुम्ही सिल्कसाठी स्पेशली डिजाईन डिटर्जेंट चा वापर ही करू शकता. अर्धी बादली पाण्यात हे मिश्रण तयार करा. त्यानंतर साडी कमीत कमी ५ मिनिटांसाठी त्यात भिजवून ठेवा. जास्तवेळ साडी पाण्यात राहणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर साडी खराब होऊ शकते. केस धुण्याचा माईल्ड शॅम्पू पाण्यात मिसळून तुम्ही साडी ५ ते ७ मिनिटांसाठी त्यात भिजवून ठेवू शकता.
३) सिल्कची साडी कशी सुकवायची?
सिल्क कधीच थेट सुर्य प्रकाशात सुकवू नये. यामुळे सिल्कचे फायबर खराब होऊ शकते. नेहमी सिल्क सावली असलेल्या भागात सुकवा. सिल्कची साडी धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. जास्त ब्रशने रगडू नका. ब्रशच्या वापराने याचा सॉफ्टनेस कमी होऊ शकता, साडी रगडताना सावधगिरी बाळगा. एक्स्ट्रा पाणी काढून टाकण्यासाठी पिळू नका.