हल्ली बऱ्याच जणींकडे भरपूर प्रमाणात सिल्कच्या साड्या असतात. काही साड्या तर अगदी १०- १५- २० वर्षे जुन्या असतात. हल्ली ड्रायक्लिनचा खर्चही खूप वाढला आहे. त्यात साडी नवी असेल तर एवढा खर्च करायला काही वाटत नाही. पण जुन्या साड्यांच्या मेंटेनन्ससाठी वारंवार ड्रायक्लिनवर पैसे खर्च करायला नको वाटत असेल (How to take care of silk saree) तर सिल्कच्या साड्या घरच्याघरी कशा पद्धतीने धुवाव्या (Simple trick to wash your expensive silk saree at home), हे एकदा पाहून घ्या (How to wash silk saree at home). जर या पद्धतीने साड्या धुतल्या तर त्यांच्यावरची चमक मुळीच कमी होणार नाही. (How to maintain silk saree for long)
सिल्कची साडी घरी कशी धुवायची?
१. सिल्कची साडी वारंवार धुवू नये. तसेच वारंवार ड्रायक्लिनही करू नये. या साड्या ४ ते ५ वेळा वापरून झाल्या की मग ड्रायक्लिन कराव्या किंवा धुवाव्या.
मटारच्या शेंगांची टरफलं फेकू नका, झाडांसाठी वापरा- झाडं वाढतील दुप्पट वेगात, बघा खास उपाय
२. सिल्कची साडी धुण्यासाठी अगदी थंड पाणी वापरावे. पाणी कोमट असले तरी साडीची चमक कमी होऊ शकते.
३. साडी धुण्यासाठी १ बादली थंड पाणी घ्या. या पाण्यात २ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर टाका. आता या पाण्यात १० मिनिटांसाठी सिल्कची साडी भिजत टाका. यानंतर पुन्हा एकदा बादलीभर स्वच्छ आणि थंड पाणी घ्या आणि त्या पाण्यात सिल्कची साडी पुन्हा स्वच्छ करून घ्या.
४. अशा पद्धतीने साडी धुतल्यानंतर ती अजिबात पिळू नका. तिच्यातलं पाणी आपोआप निथळून जाऊ द्या.
घरात घालण्यासाठी चपला घ्यायच्या? बघा ३ पर्याय- कमी किमतीत घ्या आरामदायी चपला
५. धुतलेल्या सिल्कच्या साड्या नेहमीच सावलीत वाळत घाला. सुर्यप्रकाशात वाळत घातल्याने तिची चमक जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो एखाद्या खाेलीत साडी पसरून ठेवली आणि ती वाळू दिली तरी चालेल.