Lokmat Sakhi >Social Viral > वॉशिंगमशीनमध्ये रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकत्र धुणे झाले सोपे, घ्या 'हा' जादुई कागद...

वॉशिंगमशीनमध्ये रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकत्र धुणे झाले सोपे, घ्या 'हा' जादुई कागद...

How to wash white & colored clothes together : How Colour Catcher Sheets Work : How do the colour-absorbing sheets used in washing machines work : फक्त एक पेपर शीट वापरुन रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकाचवेळी मशीनमध्ये धुवा, कपड्यांचा रंग एकमेकांना लागणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2024 04:01 PM2024-12-02T16:01:40+5:302024-12-02T16:03:03+5:30

How to wash white & colored clothes together : How Colour Catcher Sheets Work : How do the colour-absorbing sheets used in washing machines work : फक्त एक पेपर शीट वापरुन रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकाचवेळी मशीनमध्ये धुवा, कपड्यांचा रंग एकमेकांना लागणार नाही...

How to wash white & colored clothes together How Colour Catcher Sheets Work | वॉशिंगमशीनमध्ये रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकत्र धुणे झाले सोपे, घ्या 'हा' जादुई कागद...

वॉशिंगमशीनमध्ये रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकत्र धुणे झाले सोपे, घ्या 'हा' जादुई कागद...

काहीवेळा आपल्याकडून चुकून रंगीत आणि पांढरे कपडे एकत्रित धुतले जातात. असे झाल्यानंतर या रंगीत कपड्यांचा रंग पांढऱ्या कपड्यांना लागून पांढरे कपडे रंगीबेरंगी होतात. यामुळे त्या पांढऱ्या कपड्यांचा रंग पांढरा शुभ्र न राहता बदलतो, यामुळे त्या पांढऱ्या कपड्यांची शोभा निघून जाऊन ते अगदीच खराब किंवा वापरण्यायोग्य राहत नाहीत. कधीकधी अजाणतेपणानं रोजच्या कपड्यांमध्येच हे रंगीत कपडेही टाकले जातात आणि मग पुढे खऱ्या अर्थाने रंगाचा बेरंग होतो. कारण, काही कळायच्या आतच एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलेला असतो. अशावेळी आपण पांढरे कपडे वेगळे आणि रंग सोडणारे कपडे वेगळे असे वेगवेगळे धुण्याला प्राधान्य देतो. यामुळे कामही वाढते आणि कपड्यांचा किती रंग जाईल, रंग जाऊन ते जुने तर दिसणार नाहीत ना असे अनेक प्रश्न मनात असतातच(How Colour Catcher Sheets Work).

शक्यतो, रंग जाणारे कपडे आपण आधी वेगळे भिजत ठेवतो किंवा सगळ्यात शेवटी ते कपडे धुतो. याचबरोबर, रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे आपल्याला मशीनमध्ये एकाचवेळी एकत्र धुता येत नाहीत. रंगीत कपड्यांचा रंग जाऊन तो इतर कपड्यांना लागायची भीती असतेच. परंतु जर आपण रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकत्रित एकाचवेळी मशीनमध्ये (How do the colour-absorbing sheets used in washing machines work) धुवू शकलो तर किती बरे होईल. यामुळे कामाचा व्याप आणि वेळीही वाचेल. त्यासाठी एका खास गोष्टीचा वापर करून आपण रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकाचवेळी मशीनमध्ये धुवू शकतो(How to wash white & colored clothes together).

रंगीत कपड्यांचा रंग पांढऱ्याशुभ्र कपडयांना लागू नये म्हणून...  

रंगीत कपड्यांचा रंग पांढऱ्याशुभ्र कपडयांना लागू नये म्हणून किंवा हे दोन्ही कपडे एकाचवेळी एकदम वॉशिंग मशीनमध्ये धुणे झाले सोपे. यासाठी आपल्याला एका फायबरपासून तयार झालेल्या कागदाचा वापर करावा लागणार आहे. या शीट्सला कलर कॅचर शीट्स असे म्हणतात. या कलर कॅचर शीट्स आपल्याला बाजारांत किंवा ऑनलाईन अगदी सहज उपलब्ध होतील. 

या कलर कॅचर शीट्सचा वापर करून आपण एकाचवेळी वॉशिंगमशीनमध्ये रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे अगदी बिनधास्त धुवू शकतो. यासाठी सर्वात आधी आपल्याला मशीनमध्ये या कलर कॅचर शीट्सपैकी फक्त एक शीट घालावी लागेल. जर कपडे जास्त असतील तर आपल्याला अशा दोन शीट्स घालाव्या लागतील. वॉशिंगमशीनच्या वॉशिंग ड्रममध्ये या शीट्स घालूंन मग त्यात डिटर्जंट आणि कपडे घालावेत. त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडे धुवून घ्यावेत. कपडे धुवून घेतल्यानंतर या शीट्स वॉशिंगमशीनमधून बाहेर काढाव्यात. या शीट्स जेव्हा आपण बाहेर काढू तेव्हा जे कपडे रंग सोडतात त्या कपड्यांचा रंग या शीटवर लागलेला दिसेल. यामुळे रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकत्र एकाचवेळी वॉशिंग मशीनमध्ये धुवून होतील तसेच रंगीत कपड्यांचा रंग पांढऱ्याशुभ्र कपड्यांना देखील लागणार नाही. 

एकूण ३० आणि ६० शीटसचे पाकीट विकत मिळते. ३० शिट्सचे पॅकेट ३०० रुपयांपर्यंत तर ६०  शिट्सचे पॅकेट ५०० रुपयांपर्यंत इतक्या स्वस्त किमतीत विकत मिळते. हा कागद रंगीत कपड्यातून निघणारा जास्तीचा रंग चटकन शोषून घेतो यामुळे हा रंग पांढऱ्याशुभ्र कपड्यांना लागत नाही. याचबरोबर, ज्या कपड्यांचा रंग जाऊन ते अगदीच फिके किंवा जुने दिसू नये म्हणून देखील या शीट्स फायदेशीर ठरतात. या शीट्स रंग सोडणाऱ्या कपड्यांचा रंग अधिक फिका होऊ न देता आहे तसाच टिकवून ठेवण्यास मदत देखील करतो. 

लोकरीचे उबदार कपडे धुण्यासाठी महागडे क्लींजर-डिटर्जंट कशाला? ‘असा’ वापरा रिठा, गरम कपडे दिसतील नव्यासारखे...


हेअर ब्रशमध्ये केसांचा गुंता अडकलाय? गुंता ब्रशमधून काढण्याच्या २ झटपट ट्रिक्स, ब्रश होईल स्वच्छ...

कलर कॅचर शीट्स (Colour Catcher Sheets) या १००% नैसर्गिकरित्या तयार केल्या जातात तसेच त्या बायोडिग्रेडेबल फायबरपासून बनवल्या जातात. या कलर कॅचर शीट्समध्ये काही पॉझिटिव्हली चार्ज संयुगे असतात जी निगेटिव्ह चार्ज संयुगे नैसर्गिकरित्या शोषून घेतात. यामुळे कपड्यांमधून बाहेर पडणारे रंग एकदा या शीटने शोषले की हे रंग पुन्हा इतर कपड्यांना लागत नाहीत. या शीटमध्ये अतिरिक्त शोषक तंतू असतात. हे पाण्यातील कपड्यांच्या डायचे रंग आणि घाण स्वतः शोषून घेऊन तुमच्या कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी एखाद्या चुंबकासारखे काम करते. 

कलर कॅचर शीट्स ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/4fQY3Rn

Web Title: How to wash white & colored clothes together How Colour Catcher Sheets Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.