लहान मुलांच्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणताही असला तरी वारंवार डाग लावून पिवळे पडतात आणि मळकट दिसतात. वारंवार घासूनही डाग काढणं कठीण होतं. (How do you clean a white uniform at home) कपड्यांवरचे हट्टी डाग काढण्यासाठी काही ट्रिक्स वापरल्या तर कमीत कमी वेळात कपडे धुवून स्वच्छ होतील. कपडे धुण्याच्या ३ सोप्या ट्रिक पाहूया. ज्या तुमचं रोजचं काम अधिक सोपं करतील. (How to wash white school uniforms)
सुर्याचा प्रकाश
जर तुम्ही कपडे घरात सुकवत असाल तर कपडे पिवळे पडू शकतात. म्हणूनच कपडे उन्हात सुकवायला हवेत. यामुळे कपड्यांवर पिवळट डाग लागत नाही. सुर्याची किरणं कपड्यांवर पडत नाही. यामुळे २ फायदे मिळतात. कपड्यांवरचा रंग निघण्यास मदत होते याशिवाय कपड्याचा दुर्गंधही निघून जातो.
ब्लिचिंग पावडर
ब्लिचिंग पावडर आपल्या कपड्यांवरील पिवळट डाग सहज स्वच्छ करते. यासाठी तुम्ही जवळपास १५ मिनिटांसाठी थंड पाण्यात ब्लिचिंग पावडर घालून या पाण्यात १५ मिनिटांसाठी कपडे भिजवा. नंतर धुवायला घ्या. या उपायानं कपड्यांवरचे काळपट डाग सहज स्वच्छ होतील.
दंड जाड असल्यामुळे स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणं टाळता? १० नवे पॅर्टन्स, दिसाल कमाल सुंदर
लिंबाचा वापर करा
लिंबाचा वापर फक्त खाण्यापिण्यातच नसून लिंबाच्या मदतीने तुम्ही बरेच काही करू शकता. उदाहरणार्थ, लिंबाचा वापर करून तुम्ही तुमच्या पांढऱ्या कपड्यांवरील डाग सहज साफ करू शकता. डाग झालेल्या भागावर लिंबू चोळा. यामुळे हट्टी डागही दूर होतात.
बेकींग सोडा
बेकिंग सोडाच्या वापराने तुम्ही कपड्यांवरील डागही सहज साफ करू शकता. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि त्यात मळलेले कपडे भिजवा. मग साबणाने कपडे धुवा. काहीवेळानंतर कपड्यांवरील पिवळे डाग आपोआप साफ होतील.