आजकाल कपडे धुण्यासाठी अनेक घरांमध्ये वॉशिंग मशिनचा वापर केला जातो. मशिनमध्ये वॉशिंग पावडर आणि कपडे घालून टायमर लावावा लागतो. मशिनमध्ये कपडे धुवून पूर्ण वाळण्यासाठी ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. वॉशिंग मशिनमुळे कपडे धुण्याचा वेळ वाचवता येतो. (How to wash your clothes without a washing machine) अनेकांच्या घरी कपडे धुण्याासाठी वॉशिंग मशिन नसते.
असली तरी काहीजण फक्त कपडे वाळवण्यासाठी या मशिनचा वापर करतात. कारण यात कपडे धुवायला बराचवेळ लागतो. प्रत्येकवेळी हातानं कपडे धुवायला वेळ असतोच असं नाही, अशावेळी कपडे पटकन धुण्यासाठी कोणता उपाय करावा हा प्रश्न पडतो. वॉशिंग मशिन न वापरता १० मिनिटांत कपडे धुण्याची सोपी ट्रिक पाहूया. (How To Do Your Laundry Without a Washing Machine)
कपडे वेग-वेगळे करा
सगळयात आधी रंगेबीरंगी कपडे आणि पांढरे कपडे वेगळे करा. रंगीत कपडे वेगळ्या बाजूला ठेवा. कारण यापैकी कोणत्याही कपड्याचा रंग गेला तर इतर कपडे खराब होऊ शकतात. हे कपडे सगळ्यात शेवटी धुवा. २ वेगवेगळ्या बादल्यांमध्ये पाणी गरम करा. यात गरजेनुसार डिटर्जेंट पावडर किंवा लिक्वीड डिटर्जेटं घाल आणि व्यवस्थित मिसळा.
कपडे पाण्यात भिजवून ठेवा
डिटर्जेंटमध्ये मिसळेल्या पााण्यात कपडे भिजवून जवळपास ५ मिनिटांसाठी हे कपडे भिजू द्या. नंतर एक एक करून कपडे काढा आणि ब्रशच्या साहाय्यानं कपडे व्यवस्थित स्वच्छ करा. ब्रश हलक्या हातांना लावा. जेणेकरून कपडे खराब होणार नाहीत. थंड पाण्यात हे कपडे मिसळून व्यवस्थित धुवा. त्यानंतर कपडे चांगल्या पाण्यात मिसळून पिळून दोरीवर सुकवा.
या गोष्टींची काळजी घ्या
ज्या कपड्यांचा रंग निघतो त्यांना गरम पाण्यात डिटर्जेंट घालून काहीवेळ भिजवलेले राहू द्या. त्यानंतर हलक्या हातांनी रगडून थंड पाण्यानं व्यवस्थित धुवून पिळून घ्या. पांढऱ्या कपड्यांजवळ हे कपडे सुकवायला ठेवू नका. नाहीतर रंग लागण्याची शक्यता असते. या पद्धतीनं तुम्ही कमीत कमी वेळात जास्त कपडे सहज धुवून सुकवू शकता.