पावसाळ्यातील इतर समस्यांप्रमाणेच एक म्हणजे कपडे धुतल्यानंतर सुकायला खूपच वेळ लागतो. पण जास्त दिवस कपडे तसेच ठेवायलाही चालत नाही. घामाचे किंवा तेलाचे पिवळट डाग एकदा पडल्यानंतर निघता निघत नाहीत. (How to make white clothes white again ) काही वेळा अशा प्रकारची समस्या अंडरआर्म्सच्या घामामुळे देखील उद्भवते. काही हॅक्स वापरून तुम्ही कपड्यांवरचे पिवळे डाग सहज काढून टाकू शकता. (How to Whiten Yellowed Clothes)
व्हिनेगरचा वापर
मशीनमध्ये कपडे धुताना तुम्ही लाँड्री डिटर्जंटमध्ये थोडे पांढरे व्हिनेगर मिसळा. असे केल्याने, ते डाग रिमूव्हर तसेच फॅब्रिक सॉफ्टनर म्हणून काम करेल. जर तुम्ही कपड्यांवर ब्लिच वापरत असाल तर ते अजिबात घालू नका. सिल्क, रेयॉन, होजियरी सारख्या कपड्यांमध्ये व्हिनेगरचा वापर टाळा, ते कॉटच्या कपड्यांसाठी फायदेशीर ठरते.
बेकींग सोडा वापरून बनवा स्टेन क्लिनर
खूप हट्टी डाग काढण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड, डिशवॉशिंग लिक्विड साबण आणि बेकिंग सोडा वापरू शकता. या तिन्हींचे प्रमाण जास्त नसावे. हे मिश्रण कापडाच्या डागावर लावा आणि नंतर 20-25 मिनिटे तसेच राहू द्या. जास्त गडद रंगाच्या कपड्यांवर हे मिश्रण जास्तवेळ राहू देणं टाळा अन्यथा कपड्यांचा रंग उडू शकतो.
लिंबाचा रस वापरून डाग घालवा
कपड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस लिक्विड लाँड्री डिटर्जंटमध्ये मिसळा आणि कपडे धुवा. संपूर्ण वॉशिंग मशीनमध्ये फक्त 1 कप किंवा अर्धा कप लिंबाचा रस घाला. त्यामुळे ब्लीचसारखा प्रभावही मिळतो आणि लिंबाचा वास कपड्यांवर येत राहतो. कपड्यांचे वेगवेगळे डाग दूर करण्यासाठी वरील तीन टिप्स वापरता येतील, पण जर संपूर्ण कापड पिवळे झाले असेल तर या गोष्टी करा.
१) अर्धी बादली पाण्यात 4 चमचे बेकिंग सोडा विरघळवून घ्या आणि पांढऱ्या कपड्यावर 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर नेहमीप्रमाणे धुवा.
२) तुम्ही कोणतेही फॅब्रिक व्हाइटनर वापरू शकता जे तुम्हाला अधिक मदत करेल.
३) कपड्यांवर कुठेही खूप डाग असतील तर त्यात पांढरी टूथपेस्ट चोळा. त्यानंतर ते धुवा. यामुळे ते अगदी सहज स्वच्छ केले जाईल.
हे सर्व हॅक्स सुती कापडांवर उत्तम प्रकारे काम करतील. परंतु जर तुम्ही ते रेशीम किंवा सॅटिनवर वापरण्याचा प्रयत्न केला तर फॅब्रिकचे नुकसान होण्याचा धोका असतो.