पायांतील पायमोजे हे आपल्यापैकी बरेचजण रोज वापरतात. गरमी असो किंवा थंडी आपल्या पायांच्या संरक्षणासाठी मोजे महत्वाचे असतात. पायमोजे थंडीत पाय उबदार ठेवतात. तर गरमीत हे आपल्या पायांचा घाम शोषून घेतात. त्यामुळे पाय आणि बुटांना दुर्गंधी येत नाही. पायमोजे रोज वापरणाऱ्यांना याचा कालांतराने येणारा कुबट दुर्गंध सारखा त्रास देतो. काहीवेळा आपले हे मोजे रोज वापरुन खराब होतात. पायमोजे खराब झाल्याने त्यातून कुबट दुर्गंधी येऊ लागते. असे कुबट दुर्गंध येणारे पायमोजे काहीवेळा कितीही धुतले तरीही त्यातून तो दुर्गंध जाता जात नाही. अशावेळी चारचौघात असे मोजे घालून जाणे नकोसे वाटते. काहीजणांच्या मोज्यांतून काहीवेळा खूपच (Stinky socks? How to remove) दुर्गंधी येते. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती हैराण होतात आणि ज्यांनी असे दुर्गंधी येणारे मोजे घातले आहेत त्यांना देखील लाजिरवाणं वाटतं. पावसाळा असेल तर पायमोजे ओले झाल्यामुळे वास येतो, उन्हाळ्यात घामामुळे वास येतो अशा वेगवेगळ्या कारणांनी पायमोज्यांमधून कुबट वास येत असतो.
शक्यतो पावसांत एक मुख्य समस्या सतावते ती म्हणजे पाण्यामुळे आपले मोजे, चपला, बुट सतत ओले राहण्याची. पायांतील चपला, बूट, मोजे दीर्घकाळ ओलेच राहिल्यामुळे त्यातून एक विशिष्ठ ( HOW TO REMOVE THE SMELL FROM YOUR SOCKS) प्रकारची दुर्गंधी येऊ लागते. सतत पडणाऱ्या पावसामुळे कित्येकदा आपले चपला, बुट, मोजे दिवसेंदिवस तसेच ओले राहतात. या पायमोजे आणि चपला, बुटांची वेळीच स्वच्छता नाही केली तर ही कुबट दुर्गंधी कायम येत राहते. मोज्यांतून दुर्गंधी येण्याची ही समस्या दूर करण्यासाठी काय करता येऊ शकेल, याबद्दल जाणून घेऊ या(How To Get the Smell Out of socks).
पायमोज्यांमधून कुबट दुर्गंधी येते ?
१. टी बॅग :- मोज्यांमधून येणारा कुबट दुर्गंध घालवण्यासाठी केवळ डिटर्जंट पावडर पुरेशी नसते. यासाठी मोजे धुताना आपण टी बॅगचा वापर करु शकता. यासाठी थोडे गरम पाणी घेऊन त्यात टी बॅग तशाच ५ ते १० मिनिटे ठेवून द्या. त्यानंतर पाणी थोडे थंड होऊ द्यावे. पाणी थंड झाल्यावर, त्यातून टी बॅग काढा आणि आता या पाण्याने तुमचे मोजे स्वच्छ धुवून घ्यावेत. मोज्यांमधून कुबट दुर्गंधी येऊ नये म्हणून तुम्ही मोजे धुण्यासाठी या पाण्यात गुलाब पाणीही घालू शकता. यामुळे गुलाब पाण्याचा सुगंध काही दिवस या मोज्यांवर टिकून राहू शकतो.
२. संत्र्याची साल :- पायमोजे सुगंधित करण्यासाठी आपण संत्र्याची साल देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. संत्र्याची साल पाण्यात १ तास भिजवून ठेवा आणि मग या पाण्याने तुमचे मोजे धुवा. यामुळे तुमच्या मोज्यांमधून येणारा कुबट दुर्गंध निघून जाईल आणि त्यांना चांगला सुगंध येऊ शकेल.
३. टॅल्कम पावडर :- जर तुम्हाला मोजे न धुताच त्यातील दुर्गंधी घालवायची असेल तर तुम्ही टॅल्कम पावडरचा वापर करु शकता. यासाठी सर्वप्रथम मोजे हवेत किंवा सूर्यप्रकाशात व्यवस्थित वाळवून घ्या. त्यानंतर त्यावर सुवासिक टॅल्कम पावडर शिंपडा. यामुळे मोज्यांमधून येणारी कुबट दुर्गंधी अगदी लगेच नाहीशी होईल.
विड्याच्या पानांचा वेल होईल हिरवागार-वाढेल भरभर, करा फक्त ५ गोष्टी-तब्येतीत खा विडा...