सोशल मिडिया म्हणजे करमणुकीचे भांडार आहे.. इथे तुम्हाला ज्यात इंटरेस्ट असतो, ते ते सगळं उपलब्ध असतं.. आता तर अनेक हौशी मंडळी काही सेकंदांचे रिल्स बनवून ते ही सोशल मिडियावर शेअर करत असतात.. काही युनिक आणि हटके आयडिया असल्या की काही सेकंदाचाच असणारा व्हिडिओही कमाल व्हायरल होऊन जातो.. सध्या असाच एक महिलांनी केलेल्या नृत्याचा व्हिडिओ (viral video) सोशल मिडियावर गाजतो आहे..
या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की शेकडो महिला एकत्र आलेल्या आहेत. प्रत्येकीने साडी नेसली आहे... काही जणींची वेशभुषा दाक्षिणात्य वाटते.. बहुतेक जणींनी केसांचा अंबाडा घालून त्यावर छानसा गजरा माळलेला आहे.. या सगळ्या जणी एका दाक्षिणात्य गाण्यावर नृत्य (dance in a saree) करत आहेत. गाण्याचे बोल, महिलांची वेशभुषा यावरून तरी हे एखादे साऊथ इंडियन शहर असावे असे वाटते...
हम भारत के लोग…
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) February 11, 2022
pic.twitter.com/z993BnKmTh
या महिला कशासाठी नृत्य करत आहेत, कोणत्या प्रसंगानिमित्त त्या एकत्र आल्या आहेत, याची विशेष माहिती उपलब्ध नसली तरी पारंपरिक वेशभुषेत महिलांचे अतिशय आनंदाने सुरू असलेले हे नृत्य खरोखरंच खूप आकर्षक आहे.. नृत्य करणारी प्रत्येक जण अतिशय उत्साहात दिसते आहे.. स्वत:ला विसरून किंवा पुर्णपणे समरस होऊन, प्रत्येक स्टेपचा आनंद घेत या महिला नृत्य करत आहेत.. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून अल्पावधीतच तो चांगलाच लोकप्रिय झाला आहे... या व्हिडिओला हजारो लाईक्स आल्या असून एकदा तरी हे नृत्य बघावेच असे आहे.