Lokmat Sakhi >Social Viral > चॉपस्टिक्सने नूडल्स खायला नवर्‍याने शिकवले प्रेमाने; बायको झाली खूश! 'चॉपस्टिक्सवाला लव्ह', व्हिडीओ व्हायरल

चॉपस्टिक्सने नूडल्स खायला नवर्‍याने शिकवले प्रेमाने; बायको झाली खूश! 'चॉपस्टिक्सवाला लव्ह', व्हिडीओ व्हायरल

ग्वाल्हेरमधल्या अक्षिता आणि तिच्या नवर्‍याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओला पसंतीची दाद मिळते आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओत असं काय विशेष आहे? या दोघांच्या शिकण्या शिकवण्याच्या वृत्ती आणि कृतीला लोकांना कौतुकाची दाद दिली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 02:21 PM2021-12-23T14:21:30+5:302021-12-23T18:23:17+5:30

ग्वाल्हेरमधल्या अक्षिता आणि तिच्या नवर्‍याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओला पसंतीची दाद मिळते आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओत असं काय विशेष आहे? या दोघांच्या शिकण्या शिकवण्याच्या वृत्ती आणि कृतीला लोकांना कौतुकाची दाद दिली आहे.

Husband teach his wife with love to eating noodles with chopsticks.. This chostickswala love video goes viral | चॉपस्टिक्सने नूडल्स खायला नवर्‍याने शिकवले प्रेमाने; बायको झाली खूश! 'चॉपस्टिक्सवाला लव्ह', व्हिडीओ व्हायरल

चॉपस्टिक्सने नूडल्स खायला नवर्‍याने शिकवले प्रेमाने; बायको झाली खूश! 'चॉपस्टिक्सवाला लव्ह', व्हिडीओ व्हायरल

Highlights आपल्याला अमूक गोष्ट जमत नाही हे दुसर्‍याला सांगणं , ते इतरांना कळू देणं याचा संकोच अक्षिताने दाखवला नाही.बायकोला प्रेमानं शिकवणारा नवरा ही गोष्टच अनेकांना कौतुकाची वाटली. स्वत: हॉटेल मालकाला दोघांचं कौतुक वाटून व्हिडीओ केला आणि तो हॉटेलच्या इन्स्टाग्राम अकाउण्टवरुन शेअर केला.

हॉटेल/ रेस्टॉरण्टमधे गेल्यावर फोकचा वापर करत खाणं, चॉपस्टिक्सने नूडल्स खाणं हे अवघड नसलं तरी ते लगेच जमेल असं नाही. कारण मुळातच आपली हातानं खाण्याची सवय. घरात असेल तर अनेकजण मॅगीसुध्दा हातानंच खातात. हातानं खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही असाही अनुभव असल्याने बाहेर हॉटेलमधे देखील अनेकजण काटा चमचा बाजूला ठेवून हातानेच खातात. पण काही पदार्थ असे आहेत की जे खाताना फोक किंवा चॉपस्टिक्सच वापरावे लागतात. चॉपस्टिक्स वापरता येत नसल्याने खाताना होणारी फजिती अनेकांनी अनुभवली आहे. नूडल्स आवडत असले तरी ते चॉपस्टिक्सनं खाताना नको ते नूडल्स असं वाटतं काहींना.. पण नूडल्स आवडतात पण चॉप्सस्टिक्सनं खाता येत नाही म्हणून काय झालं, चॉप्सस्टिक्स कसे वापरायचे हे तर आपण शिकूच शकतो ना? पण आपल्याला चॉप्सस्टिक्स वापरता येत नाही हे सांगण्याचा संकोच वाटून शिकणं राहातं बाजूला. पण अशी चूक त्या नवविवाहित जोडप्यातल्या अक्षिताने केली नाही.

Image: Google

ग्वाल्हेरमधल्या अक्षिता आणि तिच्या नवर्‍याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओला पसंतीची दाद मिळते आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1  मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओत असं काय विशेष आहे?तर हा व्हिडीओमधील साई गुरुंग आणि अक्षिता गुरुंग हे नवविवाहित जोडपं एका हॉटेलमधे बसलेले आहेत. त्यांच्या समोर नूडल्सचं बाऊल आहे. अक्षिताच्या हातात चॉपस्टिक्स आहेत पण त्या कशा वापरायचा हे मात्र तिला समजत नाहीये. आपल्या बायकोची अडचण ओळखून साईने तिला चॉप्सटिक्स कशा पकडायच्या हे आधी शिकवलं. विशिष्ट पध्दतीनं चॉप्सस्टिक्स पकडून त्यात नूडल्स कसे धरायचे आणि खायचे हे साईनं अक्षिताला शिकवलं. त्याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं.

Image: Google

मग अक्षितानेही नवरा जसं सांगतो त्याप्रमाणे चॉप्सस्टिक्स धरुन नूडल्सचा पहिला घास खाल्ला. तो व्यवस्थित घेता आला याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर होता. नंतर अक्षिता अशा पध्दतीने चॉप्सस्टिक्सने नूडल्स खाऊ लागली जणू हे काही तिच्यासाठी सवयीची आणि नेहमीची बाब आहे जणू. शिकवणार्‍याने जर प्रेमानं, आत्मियतेने शिकवलं तर शिकणारा किती पटकन शिकतो याचं हे नवरा बायको उत्तम उदाहरण. या जोडप्याच्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या कृतीचं त्या हॉटेल मालकाला खूप कौतुक वाटलं. त्याने हा व्हिडीओ शूट करुन ‘थापा चायनिज वोक ग्वाल्हेर’ या आपल्या हॉटेलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केलं.

Image: Google

शिकण्याला वय नसतं, जागा नसते. उलट शिकण्याची इच्छा असेल तर कोणतीही न जमणारी गोष्ट सहज जमू शकते. त्या हॉटेल मालकाला या दोघांच्या शिकण्या शिकवण्याच्या वृत्ती आणि कृतीचं मोठं कौतुक वाटलं. आणि त्याने ‘ प्रेम म्हणजे रोज नवीन गोष्ट शिकणे या मराठी अर्थाची कॅप्शन ( लव मिन्स लर्निंग न्यू थिंग्ज एव्हरी डे! थॅंक यू फॉर कमिंग!’) टाकत हा व्हिडीओ शेअर केला.

नवर्‍याने बायकोला चॉप्सस्टिक्सने खाता येत नाही याबाबत न लाजता, संकोचता, तिच्यावर आरडा ओरडा न करता तिला हसतखेळत ,तिच्या कलानं चॉप्सस्टिक्सने नूडल्स खायला शिकवलं यावर नेटिझन्स जाम खूष झाले आणि व्हिडीओ पाहून त्या दोघांचं कौतुक करणार्‍या कमेण्टस टाकल्या.

Web Title: Husband teach his wife with love to eating noodles with chopsticks.. This chostickswala love video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.