मुलींना फोटो काढण्याचा खूपच क्रेझ असतो असं दिसून येतं. जिथे त्यांना संधी मिळेल तिथे त्या फोटो काढत बसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसायला येईल. खासकरून जेव्हा महिला आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडसोबत फिरायला जातात तेव्हा खूप क्लिक्स करतात. अशावेळी मुलांना जर फोटो काढायची इच्छा नसेल तर त्यांना खूप कंटाळा येतो. महिला जेव्हा वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढत असतात तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या पार्टनरची रिएक्शन पाहण्यासारखी असते. (Husband wife done funny photoshoot people laughed after watching the viral video)
Couple photography --- kuchh apna sa lagta hai, anubhav 😂🤣🤣🤣🤣
— Rupin Sharma IPS (@rupin1992) December 31, 2022
@ pic.twitter.com/266hjoqh2Y
या व्हिडिओमध्ये पती-पत्नी त्यांचे फोटोशूट करून घेत आहेत, ज्यामध्ये पत्नीने काही सेकंदात अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या, पण नवऱ्याची पोज सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखीच राहिली आणि प्रतिक्रिया अगदी सारखीच होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पतीने आपले दोन्ही हात पॅन्टच्या खिशात ठेवले आहेत. तिने मात्र वेगवेगळ्या पोझमध्ये अनेक फोटो काढले, पण नवरा फक्त एकाच पोजसाठी उभा राहिला आणि त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. चेहऱ्यावर हास्य नव्हते.
सतत चर्चेत असणारी गौतमी पाटील कोण? का तिचे नृत्य एवढे वादग्रस्त आहे?
हा मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे आणि 'कपल फोटोग्राफी... कुछ अपना सा लगता है अनुभव' असे मजेशीर कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अवघ्या 18 सेकंदांचा हा व्हिडिओ 1 लाख 47 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2500 हून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.