Join us  

I am breaking up with you! दरीत उडी मारणाऱ्या तरुणीचा व्हायरल व्हिडिओ, एक अनोखी लव्ह स्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 2:16 PM

Viral Video : डोंगरातून उडी मारताना भिती वाटणारी तरुणी बॉयफ्रेंने ढकलल्यावर त्याच्यावरच चिडते, पाहा संपूर्ण व्हिडिओ

ठळक मुद्देप्रचंड भिती वाटत असतानाही साहसी खेळ खेळण्याचे वेड अनेकांमध्ये दिसून येतेदुसरीकडे एकमेकांना धीर देणारे आणि प्रेमाचा वर्षाव करणारे हे कपल पाहून त्यांचे कौतुक वाटते

बंजी जंपिंग ही एक अतिशय साहसी अॅक्टीव्हीटी आहे. अनेकांना तर असे साहसी प्रकार करणं तर दूर, ते पाहूनही खूप भिती वाटू शकते. प्रत्यक्षात असे साहस करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण मनावर दगड ठेवून अनेक जण हे साहस करण्याचे धाडस करतात. सोशल मिडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. त्यामध्ये हे धाडस करताना घाबरणाऱ्या व्यक्ती आणि त्यांनी केलेले धाडस आपण पाहू शकतो. हा व्हिडिओ बराच जुना असला तरी आता ट्विटरवर तो पोस्ट करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे (Viral Video). 

यामध्ये एक तरुणी अतिशय उंच अशा पहाडांवरुन बंजी जंपींग करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. दोन अवाढव्य पहाड बाजुला असताना त्याच्या मधून जात पुढे जायचे असल्याचे दृश्य आपल्याला पाहूनही काहीशी भिती वाटेल असे आहे. मात्र तरीही या तरुणीला हे धाडस करायचे आहे. बंजी जंपींगमध्ये आपल्या कमरेला एक दोरी बांधलेली असल्याने आपण पडण्याचा धोका नसतो. पण तरीही दोरीच्या साह्याने एकट्याने अशाप्रकारचे धाडस करणे ही अवघड गोष्ट आहे. डोंगरातून प्रत्यक्ष उडी मारण्याची वेळ येते तेव्हा ही तरुणी खूप घाबरते. 

तिला तीन ते चार वेळा १,२,३...असे आकडे म्हणून उडी मारण्यास सांगितले जाते. मात्र तरीही उडी मारण्याचे तिचे धाडस होत नाही. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड येऊन तिचे डोक्यावर चुंबन घेतो. तू हे करु शकतेस असा धीरही तो तिला वारंवार देत असल्याचे युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिसते. मात्र तरीही ही तरुणी उडी मारण्यास घाबरते. अशावेळी तिचा बॉयफ्रेंड येतो आणि तिला डोंगरावरुन ढकलून देतो. खाली जाताना भितीने ती ओरडत असल्याचे दिसते आणि पुढे एकेठिकाणी ‘आय अॅम ब्रेकअप विथ यू’ म्हणजेच मी तुझ्यासोबतचे नाते तोडत आहे असं ती म्हणते याचा आवाजही व्हिडिओमध्ये येत आहे. हे ऐकल्यावर तिचा बॉयफ्रेंड मात्र जोरजोरात हसतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ असंख्य जणांनी पाहिला असून नोटीझन्स तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त करताना दिसत आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया