Lokmat Sakhi >Social Viral > मी गरोदर आहे आजारी नाही, असं आलिया भटसारखंच आजकाल तरुण मुलींना वाटतं कारण..

मी गरोदर आहे आजारी नाही, असं आलिया भटसारखंच आजकाल तरुण मुलींना वाटतं कारण..

Pregnant Alia says to Neetu Kapoor: गरोदर असणाऱ्या सुनबाई आलियाची (Alia Bhatt) तिच्या सासुबाई नितू कपूर (Neetu Kapoor) कशी काळजी करत आहेत, याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 07:12 PM2022-10-13T19:12:23+5:302022-10-13T19:14:07+5:30

Pregnant Alia says to Neetu Kapoor: गरोदर असणाऱ्या सुनबाई आलियाची (Alia Bhatt) तिच्या सासुबाई नितू कपूर (Neetu Kapoor) कशी काळजी करत आहेत, याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

"I am pregnant, not ill.. So I am fine", Many young pregnant women feel same like Alia Bhatt | मी गरोदर आहे आजारी नाही, असं आलिया भटसारखंच आजकाल तरुण मुलींना वाटतं कारण..

मी गरोदर आहे आजारी नाही, असं आलिया भटसारखंच आजकाल तरुण मुलींना वाटतं कारण..

Highlightsनितू कपूर यांची काळजी साहजिक असली, तरी अनेक गरोदर महिलांना अशी ओव्हर प्रोटेक्टीव्ह वागणूक मुळीच आवडत नाही. 

आलिया भट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt- Ranbeer Kapoor) हे बॉलीवूडचं सगळ्यात जास्त चर्चेत असणारं जोडपं. त्यांचं लग्न तर वाजतगाजत झालंच, लग्नाची चर्चाही खूप झाली. पण त्यानंतर आलियाने अवघ्या २- ३ महिन्यातच दिलेल्या गुडन्यूजमुळे पुढे आणखीनच चर्चा रंगली. आताही प्रेग्नंट आलियाच्या प्रत्येक गोष्टीवर तिच्या चाहत्यांची नजर असून तिच्या बाबतच्या वेगवेगळ्या गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात. आताही आलिया, तिच्या सासूबाई आणि लोकप्रिय अभिनेत्री नितू कपूर आणि नवरा रणबीर कपूर यांचा एक मस्त व्हिडिओ व्हायरल (viral video of Alia Bhatt and Neetu Kapoor) झाला आहे. 

 

त्याचं झालं असं की रणबीर- आलिया आणि नितू कपूर हे नुकतेच एक- दोन दिवसांपुर्वी डिनरसाठी हॉटेलमध्ये गेले होते. तिथून बाहेर पडत असताना आलिया सगळ्यात पुढे होती आणि रणबीर नितू कपूर यांचा हात धरून मागून येत होता.

३ बर्नरची शेगडी घ्यावी की ४? ग्लास टॉप घ्यावी की स्टिलच बरे? कशी निवडाल परफेक्ट गॅस शेगडी?

आलिया पायऱ्यांजवळ येताच नितू कपूरने त्याच्याकडून स्वत:चा हात सोडवून घेतला आणि पुढे जाऊन आलियाचा हात पकड असा सल्ला दिला. हा सल्ला ऐकून आलिया खुदकन हसली आणि आय एम फाईन असं तिने तिच्या सासुबाईंना ठणकावून सांगितलं. नितू कपूर यांची काळजी साहजिक असली, तरी अनेक गरोदर महिलांना अशी ओव्हर प्रोटेक्टीव्ह वागणूक मुळीच आवडत नाही. 

 

गरोदरपणात स्वत:ची काळजी घेणं अगदी गरजेचं आहे. पण बऱ्याचदा गरोदर महिलांच्या घरातले लोक त्यांच्या बाबतीत खूपच जास्त काळजी करताना दिसतात. काळजी एवढी जास्त होते की बऱ्याचदा मग त्या महिलांना आपण गरोदर नसून आजारी आहोत की काय असे वाटू लागते.

करवा चौथनिमित्त मौनी रॉयने काढलेल्या मेहंदीचे फोटो झाले जबरदस्त व्हायरल, बघा कसं होतं खास डिझाईन

तिचं चालणं, बोलणं, बसणं, फिरणं, खाणं- पिणं अशा सगळ्याच गोष्टींवर हळूहळू मर्यादा येऊ लागते. आणि नऊ महिने हे सगळं सहन करणं अनेकींना असहाय्य होतं. त्यातूनच मग गरोदरपण म्हणजे एक प्रकारचं बंधन वाटू लागतं. म्हणूनच तर आम्ही गरोदर आहोत, आजारी नाही... असं आजकालच्या गरोदर मुली ठणकावून सांगत आहेत. 
 

Web Title: "I am pregnant, not ill.. So I am fine", Many young pregnant women feel same like Alia Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.