Lokmat Sakhi >Social Viral > पुरे देश को तुम पे ‘नाज’ है, हरनाज!- हरनाजचा अफलातून कॉन्फिडन्स जेव्हा जिंकतो..

पुरे देश को तुम पे ‘नाज’ है, हरनाज!- हरनाजचा अफलातून कॉन्फिडन्स जेव्हा जिंकतो..

तब्बल २१ वर्षानंतर भारताच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा. मिस युनिव्हर्स हरनाज संधू. (miss world harnaaz sandhu)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:25 PM2021-12-13T12:25:53+5:302021-12-13T14:59:14+5:30

तब्बल २१ वर्षानंतर भारताच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा. मिस युनिव्हर्स हरनाज संधू. (miss world harnaaz sandhu)

'I believe in myself!' - says Miss Universe Harnaz Sandhu, comparing herself with others..why? | पुरे देश को तुम पे ‘नाज’ है, हरनाज!- हरनाजचा अफलातून कॉन्फिडन्स जेव्हा जिंकतो..

पुरे देश को तुम पे ‘नाज’ है, हरनाज!- हरनाजचा अफलातून कॉन्फिडन्स जेव्हा जिंकतो..

Highlightsसुश्मिता सेन आणि लारा दत्तानंतर हरनाज भारतीची तिसरी मिस युनिव्हर्स

“स्वत:वर विश्वास ठेवा, तुम्ही युनिक आहात आणि तीच तुमच्याकडे असलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे, हे कायम लक्षात ठेवा. दुसऱ्याशी तुलना करणे सोडा आणि जगभरात ज्या गोष्टी घडत आहेत त्यावर बोला. कोषातून बाहेर या आणि तुमच्यासाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या आयुष्याचे लिडर आहात. तुम्ही स्वत:चा आवाज बना. माझा स्वत:वर विश्वास आहे म्हणून आज मी याठिकाणी उभी आहे.” भारतीय मॉडेल असलेल्या हरनाज संधू हिने ७० वा मिस युनिव्हर्स किताब पटकावत भारतीयांची मान उंच केली आहे. या सोहळ्यादरम्यान हरनाजला  त्यावेळी तिला हा प्रश्न विचारण्यात आला . (miss world harnaaz sandhu)

शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये निवडून येण्यासाठी घेण्यात आलेल्या राऊंडमध्ये सहभागींना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तरुणींनी त्यांना असलेल्या ताणाला कसे तोंड द्यायचे? याबद्दल हा सोहळा पाहणाऱ्यांना काय सांगाल असे हरनाजला विचारण्यात आले. तिने त्यावर अतिशय नेमके उत्तर देत उपस्थितांची मने जिंकली आणि तब्बल २१ वर्षांनी भारताच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला. तिच्या या उत्तरामुळे ती अंतिम तीनच्या यादीत निवड झाली. याबरोबरच तिला पर्यावरणाशी निगडीत आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता. अनेकांना हवामानबदल हा फसवा आहे असे वाटते, त्यांना तुम्ही याबाबत कसे पटवून द्याल? निसर्ग अनेक अडचणींचा सामना करत आहे आणि त्याला आपले वागणे जबाबदार आहे. आता कमी बोलून जास्त कृती करायची वेळ आली आहे. कारण आपली प्रत्येक कृती एकतर निसर्गाचे रक्षण करेल नाहीतर त्याचा नाश करेल. पश्चाताप आणि दुरुस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणे केव्हाही चांगले असेच मी याबाबतीत तुम्हाला सांगेन असे हरनाझ म्हणाली.

अवघ्या २१ वर्षांची असलेली हरनाज  चंदीगडची आहे. ती आता पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याआधी तिने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हरनाजने नुकताच मिस दिवा मिस युनिव्हर्स २०२१ हा किताब पटकावला होता. तर २०१९ मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाब हा किताबही तिने पटकावला होता. तिने आतापर्यंत अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले असून तिला आताच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत मेक्सिकोची अँड्रिया मेझा हिने हरनाझच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सच्या मुकुट घातला. ती २०२० ची मिस युनिव्हर्स विजेती होती. २१ वर्षीय हरनाझ नृत्य, पोहणे आणि घोडेस्वारी यामध्येही तरबेज आहे. याआधी सर्वात पहिल्यांदा १९९४ मध्ये सुष्मिता सेन हिने भारताला मिस युनिव्हर्सचा बहुमान मिळवून दिला होता. तर त्यानंतर २००० मध्ये लारा दत्ता हिने मिस युनिव्हर्स किताब पटकावला होता. 


 

Web Title: 'I believe in myself!' - says Miss Universe Harnaz Sandhu, comparing herself with others..why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.